one patien dead in sangamner
one patien dead in sangamner 
अहमदनगर

रिपोर्ट आला नि पाठोपाठ मृत्यूही, संगमनेरात भावाकडे आलेली बाधित महिला दगावली

सकाळ वृत्तसेवा
संगमनेर ः मुंबईतील विक्रोळी येथून संगमनेरातील भावाकडे आलेल्या68वर्षीय महिलेचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर काही वेळेतच त्या महिलेचे नगरच्या जिल्हा रुग्णालयात निधन झाले. घटना सोमवारी(ता.25) रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली.यामुळे संगमनेरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या मृतांची संख्या चारवर पोचली आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब व न्यूमोनियाचा त्रास असलेली ही वयोवृध्द महिला तिच्या संगमनेरातील भावाने खासगी वाहनातून स्वतः सारथ्य करीत कालच संगमनेरात आणली होती. प्रवासात तिला त्रास जाणवू लागल्याने, संगमनेरला पोचताच भावाने त्यांना एका खासगी दवाखान्यात नेले.
 
हेही वाचा - पारनेर हादरले, मुंबईहून आलेल्या वृद्धाचा मृत्यू

डॉक्टरच्या सहायकाने तापमान व पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करताना, कोरोनाचा संशय आल्याने, संबंधित डॉक्टरांनी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथून हे बहिण भाऊ रुग्णवाहिकेतून नगरच्या जिल्हा रुग्णालयात गेले. तेथे घेतलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर थोड्यातच वेळात रात्री नऊच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला.

या बाबतची माहिती समजताच संगमनेरच्या प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेला रुग्णवाहिका चालक, भाऊ व खासगी दवाखान्यातील कर्मचाऱ्याला तपासणीसाठी नगरला पाठवले आहे. दरम्यान ही महिला संगमनेरात मुक्कामी नसल्याने या घटनेचा शहराशी प्रत्यक्ष संबंध आलेला नाही. त्यामुळे संगमनेरात आजपासून जवळपास सर्व व्यवहार सुरु झाले असून, पार दिवसांनी शहरातील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT