Death of a young man in a beating 
अहिल्यानगर

वाळकीत झालेल्या मारहाणीतील तरूणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका ः वाळकी येथे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओमकार बाबासाहेब भालसिंग (वय 21) असे त्याचे नाव आहे. 

वाळकी येथे 15 दिवसांपूर्वी जून्या वादातून ओमकार भालसिंग यास विश्‍वजित रमेश कासार याच्यासह सहा ते सात जणांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने, ओमकार याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात आता खुनाचे कलम वाढविले आहे. घटना घडल्यापासून आरोपी पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

याबाबत मृत ओमकारची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी आज मुलाचा खून करणाऱ्या आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT