Decision on final year examination soon - Tanpure 
अहिल्यानगर

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय, मंत्री तनपुरेंची माहिती

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दिली.

पत्रकारांशी बोलताना तनपुरे म्हणाले, ""राज्य सरकारने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचे ठरविले. त्यामागे कुठलेही राजकारण नाही. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका झाल्या. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे ठरविले होते; परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलैची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली.

या बाबत सोशल मीडियाद्वारे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. "कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. परीक्षेची टांगती तलवार राहिली, तर कोरोनामुळे आरोग्यास व जीवितास धोका होऊ शकतो. परीक्षा पुढे ढकलली, तर नोकरीची संधी जाईल. विद्यार्थी मानसिक तणावाखाली राहतील,' अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. त्यावर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून मागील सर्व सेमिस्टरचे सरासरी गुण द्यावेत. ज्या विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी परीक्षा देण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी जुलैनंतर ऐच्छिक परीक्षा घ्यावी. याविषयी सर्वांचे एकमत झाले.'' 

विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव नको, एवढाच उद्देश आहे. त्यामागे कुठलेही राजकारण नाही. परंतु विरोधकांनी त्याचे राजकारण केले. सद्यःस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी कायदेशीर बाबी तपासणीची प्रक्रिया चालू आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे तनपुरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT