Dilip Walse Patil Dilip Walse Patil
अहिल्यानगर

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन्सचा निर्णय; गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर शुक्रवारी (ता. 28) आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर शुक्रवारी (ता. 28) आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अहमदनगर - राज्यात द्राक्ष फळबागेखालील क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. द्राक्ष उत्पादक (Grapes Production) शेतकऱ्यांना (Farmer) चांगला भाव मिळावा, यासाठी मॉलमध्ये वाईन्स विक्रीचा (Wines Selling) निर्णय घेण्यात आला आहे, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse Patil) यांनी व्यक्‍त केली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर शुक्रवारी (ता. 28) आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहराध्यक्ष माणिक विधाते, घनश्‍याम शेलार, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला राज्य उपाध्यक्षा शारदा लगड आदी उपस्थित होत्या.

गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले की, न्याय पालिका आणि विधानमंडळ यांना राज्यघटनेने काही सीमा रेषा आखून दिलेल्या आहेत. यामुळे विधानमंडळ आणि संसदेत घेतलेल्या निर्णया विरोधात शक्‍यतो न्यायालयात जाऊ नये आणि न्यायालयाने त्याची किती दखल घ्यावी, याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. न्यायपालिका आणि विधानमंडळ या दोघांच्या हक्कांच्या संरक्षणाचा प्रश्‍न असल्याने सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबन रद्द केल्याच्या निर्णयावर विधानमंडळ म्हणून आता काय भूमिका घेतली जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे. मात्र, या निर्णयाची पूर्णप्रत आल्यानंतर सविस्तरपणे भाष्य करता येईल. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले असले तरी विधानमंडळाने त्यावेळी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. तो एका व्यक्तीने घेतलेला निर्णय नव्हता. यापूर्वी देखील असे प्रसंग घडलेले आहेत. भाजपला काय म्हणावयाचे ते म्हणून द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेत राज्यातील द्राक्षांचा खप कमी आहे. यामुळे अनेकांनी वायनरी टाकलेल्या आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या मॉलमध्ये छोट्याशा जागेत त्याची विक्रीला परवानगी आहे. किरकोळ किराणा दुकानात अशी विक्री करता येणार आहे, असे सांगत राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयाचे निर्णयाचे समर्थन केले. तसेच वाईन विक्रीतून राज्याच्या महसूलात वाढ होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नागपूर परिसरात अनेक ठिकाणी अश्‍लील डान्सच्या सुरू असलेल्या प्रकरांवर कडक कारवाई दोषींवर केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत चौकशी करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

पालकमंत्री पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठीकडे

राज्याचे ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे या पालकमंत्रीपद तुम्ही घेणार का? अशी विचारणा केली असता, त्यांनी हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगून या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले

Uttarakhand Tourism: उत्तराखंडला फिरायला जाताय? लपलेली मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं अनुभवायला विसरू नका!

SCROLL FOR NEXT