अहमदनगर

नगर जिल्हा परिषदेच्या भूखंडांचे होणार अॉडिट

दौलत झावरे

नगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीचे किती भूखंड आहेत, त्यांवर किती अतिक्रमण झाले आहे, याची माहिती घेऊन त्या जागा भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, या मुद्द्यावरून सदस्यांनी सभेत आक्रमक भूमिका मांडली. या प्रश्‍नावर बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी दिले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेच्या जागा किती, त्यावर अतिक्रमणे किती आहेत, याची माहिती विचारली. त्यावर प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले; मात्र त्यावर त्यांचे समाधान झाले नाही.

हाच मुद्दा पकडत जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी शेवगावमधील जिल्हा परिषदेच्या जागेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. सदस्य राजेश परजणे यांनीही या मुद्दा लावून धरत, प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, जिल्हा परिषदेच्या जागा भाडेतत्त्वावर द्याव्यात, अशी मागणी केली. (Decision to audit Zilla Parishad plots)

सभापती सुनील गडाख यांनी मध्यस्थी करीत बीओटी तत्त्वावरील बांधकामांच्या संदर्भात पुढील मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये संबंधित अधिकारी व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

सभेत आरोग्य विभागाचे कौतुकही झाले व झाडाझडतीही घेण्यात आली. सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या चोरीच्या घटना घडल्यावरून प्रशासनाला जाब विचारला. पदाधिकारी व प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याने असे प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सदस्य राजेश परजणे यांनी अर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या वाटपावरून आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

परजणे यांनी कोपरगावमध्ये लसीकरण केंद्रे कमी असल्याच्या मुद्द्यावरून आरोग्य विभागाला धारेवर धरले.

याच दरम्यान परजणे यांनी, मंत्र्यांचा तालुका असल्याने संगमनेरला सगळीकडे लसीकरण होत असल्याचे म्हटले. त्यावरून सदस्य मिलिंद कानवडे व परजणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. काकडे यांनी हस्तक्षेप करीत, मंत्र्यांचा तालुका असल्याने प्रशासन गांभीर्याने काम करीत असेल, असे म्हणून या वादावर पडदा टाकला. कानडे म्हणाले, की आम्ही बैठका घेऊन लसीकरणाचे नियोजन केले. त्यामुळे आमच्याकडे लसीकरण सुरू आहे. कानडे यांच्यापाठोपाठ जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनीही, आम्ही नगर तालुक्यामध्ये असेच नियोजन केल्याने लसीकरण सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.

  • आरोग्य विभागाची झाडाझडती

  • रुग्णवाहिकांचे हस्तांतर

  • अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

  • लसीकरण केंद्रांची संख्या

  • खर्डा गटातील प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे

  • सामान्य रडारवर

  • जिल्ह्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली न वाहने

  • विषय सूचीतील शुद्धलेखनातील चुका

  • मागील सभेत झालेले ठराव न झाल्याचे दाखविणे.

  • ठराव मंजूर असूनही नामंजूर दाखविणे

  • मुख्यालयातील बंद कॅमेरे

  • हीरकमहोत्सवी कार्यक्रमाला सदस्यांना न बोलावणे

  • जिल्हा परिषदेच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडण्याचा प्रकार

  • ग्रामपंचायत विभागाची झाडाझडती

  • अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटप

  • संशमनवटी गोळ्या न वाटणे

  • डीव्हीडीएफ कर्जवाटप

  • (Decision to audit Zilla Parishad plots)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT