decision to ban firecrackers in Ahmednagar city on Diwali will be taken at municipal meeting Google
अहिल्यानगर

अहमदनगर शहरात फटाकेबंदी? महापालिका सभेत होणार निर्णय

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : दीपावलीनिमित्त होणाऱ्या आतषबाजीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी महापालिकेला सूचना पाठवून प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेबंदी करण्याबाबत प्रस्ताव महासभेसमोर ठेवावा, असे म्हटले आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेच्या सभेत अंतिम निर्णय होणार आहे.

दर वर्षी दीपावलीला फटाक्यांची आतषबाजी होते. मागील वर्षी कोरोनामुळे अनेक बंधने आली. या वर्षी काहीअंशी नियम शिथिल असले, तरी शासनाच्या वसुंधरा अभियानांतर्गत प्रदूषण टाळणे महत्त्वाचे आहे. त्याच कारणाने नाशिक विभागीय आयुक्तांनी फटाकेबंदीबाबत महापालिका आयुक्तांना सूचनापत्र दिले आहे. याबाबत महापालिकेच्या सभेत ठराव मांडावा, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या महासभेत याबाबत चर्चा होणार आहे. फटाकेबंदी करायची की नाही, याचा निर्णय सर्वस्वी महासभेवर अवलंबून राहणार आहे.

फटाकेविक्रेत्यांना धास्ती

फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यतेच्या चर्चेने फटाके व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. फटाक्यांचे बुकिंग सहा महिने आधी करावे लागते. बहुतेक व्यापाऱ्यांनी नोंदणी करून कंपन्यांकडून फटाके उपलब्ध करून घेतले आहेत. शहरात बंदी आणल्यास त्याचा मोठा परिणाम या व्यावसायिकांवर होणार आहे.


फटाकेबंदीबाबत नाशिक विभागीय आयुक्तांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. पदाधिकारी याबाबत योग्य तो ठराव करतील. त्यानंतर फटाकेबंदी होईल की नाही हे स्पष्ट होणार आहे.
- शंकर गोरे, आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election 2025: निवडणुकीसाठी आयोगाची यादी धरणार ग्राह्य; ३१ जुलै २०२५ पर्यंतची राहणार मतदार यादी

Mhada Lottery: ५ वर्षांत ३५ लाख घरे, मुंबईत मिळणार परवडणारी घरे; एकनाथ शिंदे यांची घोषणा

Gold Rate Today : सोन्याची घौडदौड सुरुच, एका आठवड्यात तब्बल ५६८० रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Nagpur Municipal Election: ७० टक्के माजी नगरसेवकांची; तिकिटे कापणार! नागपूर मनपा निवडणूक, भाजपचा ‘युवा ब्रिगेड’ फॉर्म्युला

Mumbai News: पालिकेला मराठीचे वावडे! राष्ट्रीय उद्यानाचा आराखडा इंग्रजीत; आदिवासी संतप्त

SCROLL FOR NEXT