Decision was taken regarding stuck deposits in Nashik District Bank 
अहिल्यानगर

नाशिक जिल्हा बँकेत अडकलेल्या ठेवींबाबत झाला निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नगर : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे चारशे कोटींच्या ठेवी, भागभांडवल अनेक वर्षांपासून अडकले आहेत.

अनेक आंदोलनानंतर बॅंक ठेवी परत देण्यास तयार होत नाही. याबाबत राज्य पतसंस्था फेडरेशनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर मार्ग करण्यासाठी तत्काळ बैठकीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वसंत लोढा यांनी दिली. 

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे चारशे कोटींच्या ठेवी, भागभांडवल अनेक वर्षांपासून अडकले आहेत.

या बाबत राज्य पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व स्थैर्यनिधी संघाने अनेकदा आंदोलने केली. शेतकरी कर्ज माफीचे पैसे शासनाकडून जमा होताच पतसंस्थांचे पैसे परत देऊ, असे आश्वासन दिले होते.

शासनाचे कर्जमाफीचे पैसे बॅंकेत जमा होऊनही बॅंक पतसंस्थांच्या ठेवी परत करत नव्हती. त्यामुळे वसंत लोढा यांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर 28 ऑगस्टला प्रभारी सहकार मंत्री जयंत पाटील यांच्या कक्षात राज्य पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष काका कोयटे व पदाधिकाऱ्यांसह बैठक झाली.

या तोडगा काढण्यासाठी तत्काळ बैठक घ्या, असा आदेश संबंधितांना दिला आहे. त्यामुळे निबंधकांनी बैठक बोलविण्याची मागणी करण्यात आली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT