nagar 
अहिल्यानगर

कोरोनाच्या संकटात 'यांनी' दिला, कामबंद आंदोलनाचा इशारा 

गौरव साळुंके

श्रीरामपूर, (अहमदनगर) : दोन वर्षापासुन कृषी पदवीधर व कृषी सहाय्यकांवर अन्याय होत असून २०१८ च्या अधिसूचनेला स्थगिती देऊन त्यात नव्याने सुधारणा करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर कर्मचारी संघटनेच्यावतीने कृषीमंत्री दादाजी भुसे व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन सरकारला दिले असून संघटना रविवार (ता. १६) पासून काम बंद करुन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष दिपक बोर्डे यांनी दिली. राज्यातील कृषी पदवीधर व कृषी सहाय्यकांवर २९ जानेवारी २०१८ च्या अधिसूचनेमुळे अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने सदर अधिसूचनेला स्थगिती देऊन त्यात नव्याने सुधारणा करावी. कृषी सहाय्यकांना व कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देताना सवलती द्याव्यात.

राज्यातील कृषी पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावी. सरकारने गेल्या दहा वर्षापासुन कृषी पर्यवेक्षकांची भरती केलेली नाही. त्यामुळे कृषी पदवीधरांवरील अन्याय दुर करुन त्यांना पदोन्नतीची संधी द्यावी. तसेच कृषी सेवकांची वेतनवाढ करावी. अशा विविध मागण्याचे निवेदन संघटनेच्यावतीने सरकारला दिल्याचे बोर्डे यांनी सांगितले. संघटनेच्या मागण्या लवकरच मान्य न झाल्यास रविवार (ता.१६) पासुन काम बंद करुन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष बोर्डे यांनी दिली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT