नेवासे : शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक व नगरसेवक पुत्राचा चेहरा वापरुन त्यास अश्लिल हावभाव करणारे व्हिडीओ तयार करुन ते व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल करून बदनामी करीत असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीस अटक करण्यात नेवासे पोलिसांना यश आले आहे. आरोपीस नेवासे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (ता. ७) फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
निखील रविकिरण पोतदार ( वय २७, मूळ राहणार नांदेड, हल्ली राहणार सदाशिव पेठ पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी एका समाजाचे वतीने नेवासे पोलिसांना निवेदन दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत त्यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस कार्यालयातील सायबर शाखेच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने निष्पन्न आरोपी निखील पोतदार यास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलिस नाईक, अशोक कुदळे, कॉन्स्टेबल अंबादास गिते, केवल रजपुत यांच्या पथकाने अटक केली.
लुटारू अटकेत
नेवासे बस स्थानकात आपल्या गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या फिर्यादी ज्ञानदेव यशवंत बर्डे ( रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांना (ता.१७) आक्टोबर २०२१ रोजी लिफ्ट देऊन नेवासे-नेवासे फाटा रस्त्यावरील काझी नाला येथे दमदाटी करत चॉपरचा धाक दाखवत लुटल्या प्रकरणी नेवासे पोलिसांनी यातील आरोपी रॉकी रमेश चांदणे (वय-२३, राहणार लक्ष्मीनगर,नेवासे शहर) याला तांत्रिक तापासवरून अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.