Demand only to BJP Newaskars 
अहिल्यानगर

भाजपत नेवासकरांनाच डिमांड, जुन्यांवर नव्यांचीच कमांड

सुनील गर्जे

नेवासे : भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी नुकतीच भाजप व भाजप प्रणित विविध आघाड्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यात नेवासे तालुक्याला झुकते माप देण्यात आले असले तरी ग्रामीण भागात गावोगावी भाजप वाढविणाऱ्या भाजपच्या निष्ठावान कार्येकर्त्यांना डावलण्यात आल्याने भाजपच्या जुन्यांत कमालीची नाराजीचा सूर आहे.  

नव्या कार्यकारिणीत भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर व भाजप नेते सचिन देसरडा यांच्यासह तब्बल अठराजणांची वर्णी लागली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

भाजपच्या उत्तर जिल्हा कार्यकारिणीत नेवासे तालुक्यातील पदाधिकारी व त्यांची पदे असे : सचिन देसरडा, (जिल्हा उपाध्यक्ष), नितीन दिनकर ( जिल्हा संघटन चिटणीस), दिलीप नगरे, अंकुश काळे ( जिल्हा सचिव), अॅड. पंढरीनाथ अंबाडे (कायदा सेल संयोजक), ज्ञानेश्वर बर्डे ( जिल्हा माजी सैनिक सेल संयोजक), ज्ञानेश्वर पेचे, दिनेश कुलकर्णी, दिलीप पवार, नामदेव खंडागळे, विश्वास काळे, आशा मुरकुटे, माजी नगराध्यक्षा संगीता बर्डे, चंपालाल बोरा, दत्तात्रय काळे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) तर विठ्ठल लंघे, बाळासाहेब मुरकुटे, उदयसिंह चंदेल (जिल्हा कार्यकारिणी कायम निमंत्रित सदस्य).

दरम्यान तालुक्यातील अनेक भाजपच्या महत्वाच्या सक्रिय ज्येष्ठ, तरुण निष्ठावान नेते, माजी पदाधिकारी, कार्येकर्त्यांना नव्या कार्येकारणीत डावलण्यात आल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप कार्येकारणीतून निदर्शनास येत आहे. त्यामुळे आगामी काळात नेवासे भाजपमध्ये अंतर्गत कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  
 
नव्या कार्येकारणीत यांना डावलले
जिल्हा कार्यकारणीत भाजप नेते व नियोजन मंडळाचे माजी सदस्य दिनकर गर्जे, ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे, युवा नेते अनिल ताके, ऍड. संजीव शिंदे, डॉ. लक्ष्मण खंडाळे, पोपट जिरे, सुभाष पल्लोड, गिरीश जोशी, डॉ. रावसाहेब फुलारी या भाजप निष्ठावानांना डावलण्यात आल्याचा सूर सध्या नेवासे तालुक्यात ऐकायला मिळत आहे. 

भाजपची ताकद वाढणार : नितीन दिनकर 
"जिल्हा भाजप कार्येकारणीत तालुक्याला झुकते माप मिळाले असून आम्ही सर्वजण भाजपची ध्येयधोरणे तळागाळापर्येंत राबविण्याचा प्रयत्न करू. तालुक्यात नक्कीच पक्षाची ताकद वाढणार आहे  असा विश्वास भाजपचे नेवासे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्यक्त केला.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT