Departure of pregnant woman to Mauli Pratishthan in Sangamner 
अहिल्यानगर

अवघडल्या अंगाने व गर्भाच्या ओझ्यामुळे थकल्या भागल्या अवस्थेत ‘ती’ संगमनेरमध्ये फिरत होती

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : समाजाच्या विकृतीचे दर्शन घडवीत ती अवघडल्या अंगाने व गर्भाच्या ओझ्यामुळे थकल्या भागल्या अवस्थेत संगमनेर शहरात फिरत होती. झालेल्या अत्याचारामुळे मुळातच मनोरुग्ण असलेली ती अधीकच उध्वस्त झाली होती.

तिची विचारपूस करणाऱ्यावरही विश्वास नसल्याने, शिव्याशाप देत, प्रसंगी दगडांचा मारा करीत होती. तिची ही अवस्था पाहून, पोलिस व आधार फाऊंडेशनच्या शिलेदारांनी तिची रवानगी डॉ. राजेंद्र धामणे यांच्या शिंगवे नाईक येथील माऊली प्रतिष्ठानमध्ये केली.

शहरातील विद्यानगर परिसरात 20 दिवसांपासून सुमारे 30 ते 35 वर्ष वयोगटातील ही गर्भवती महिला फिरत होती. मनोरुग्ण असतानाही काही विकृत वासनांध लांडग्यांनी केलेल्या अत्याचाराचे फळ पोटात वाढवीत जगाचे भान नसलेली ती मिळेल तो भाकर तुकडा खावून दिवस कंठीत होती. या अत्याचाराच्या मनावर खोलवर झालेल्या जखमांमुळे, कोणी चौकशी करताच अंगावर धावून जात, शिव्याशाप देत दगडांचा मारा करीत होती. स्वतःचे नाव न सांगता गावाचे नाव मालेगाव, गंगाखेड तर कधी आळेफाटा सांगत होती.

सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तिला मानवतेच्या भावनेतून दोन तीन वेळा उपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ती तेथून पळून गेली होती. या महिलेची माहिती डॉ. किशोर पोखरकर यांनी आधार फाउंडेशनचे समन्वयक सोमनाथ मदने, सुखदेव इल्हे यांना सांगितली.

त्यांनी याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्याशी चर्चा केली व या महिलेची व्यवस्था डॉ. राजेंद्र धामणे यांच्या शिंगवे येथील माऊली प्रतिष्ठानमध्ये करण्यासाठी त्यांच्य़ाशी संपर्क केला. काल दुपारी या महिलेला संगमनेर कॉलेज परिसरातून दोन महिला व एक पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांसोबत समजावून सांगत, रुग्णवाहिकेतून तिची रवानगी करण्यात आली.

यावेळी आधारचे समन्वयक पी. डी. सोनवणे, माजी सैनिक लक्ष्मण ढोले आदी उपस्थित होते. या पिडीत मनोरुग्ण महिलेचे दिवस भरत आल्याने रस्त्यावरच प्रसुतीचा धोका होता. त्यामुळे नवजात अर्भकासह तिच्याही जीवीताला धोका असल्याने, तिला वेळेवर डॉ. राजेंद्र धामणे यांच्या इंद्रधनू प्रकल्पात आसरा मिळाला आहे. यापुर्वीही आधार फाऊंडेशनने अशाच रस्त्यावर फिरणाऱ्या चार महिलांना इंद्रधनू प्रकल्पातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.


संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

VIDEO : विकृतीचा कळस! श्वानाच्या पिल्लाला जबरदस्ती पकडलं अन् दारू पाजली; तरुणांचं संतापनजक कृत्य

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Mumbai News: टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण, २०२६ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत

SCROLL FOR NEXT