deputy superintendent police sandeep mitke
deputy superintendent police sandeep mitke  sakal
अहमदनगर

पोलिस उपधीक्षक मिटकेंना "सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी" पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख 25 हजार रुपये देण्यात आले आहे. मिटके यांनी अहमदनगर शहर येथे कार्यरत असताना तोफखाना पोलिस ठाणे अंतर्गत एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या गुन्ह्याचा कौशल्यपणाला लावून तपास केला होता. या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे.(deputy superintendent police sandeep mitke award)

आरोपी अफसर लतिफ सय्यद याने 15 नोव्हेंबर 2018 रोजी एका अल्पवयीन मुलीला बंद घराच्या छतावर घेऊन मारहाण केली व तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. त्यावेळी आरोपी मुन्नी ऊर्फ शमिना लतिफ सय्यद घटनास्थळी आली आणि तिने पीडित मुलीला झालेल्या प्रकाराबाबत तू तुझे घरी कोणाला काही एक सांगू नकोस, नाहीतर मी तुझे घरी येऊन तुझे आईला तुझे नाव सांगेल, अशी धमकी दिली. तिला तिच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी अफसर लतीफ सय्यद याने पीडित मुलीस पुन्हा सायंकाळीचे वेळेस जीवे मारण्याची भीती दाखवून तिला विवस्त्र करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. गुन्ह्याचे विरोधात राज्यभर पडसाद उमटले होते.

विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी मोर्चे व आंदोलने करून निषेध व्यक्त केला होता. पोलिस उपनिरीक्षक विशाल सणस यांच्याकडे प्रारंभी तपास होता. या गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून उपधीक्षक मिटके यांचेकडे तपास वर्ग करण्यात आला. मिटके यांनी सखोल माहिती घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी अफसर सय्यद यास 20 वर्षे सक्‍तमजुरी दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी मुन्नी उर्फ शमिना सय्यद हिस एक महिना साधी कैद दंडाची शिक्षा ठोठावली.

तपास पथकात यांचा समावेश

त्यांच्या तपास पथकात परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पुनम, उपनिरीक्षक विशाल सणस, जया तारडे, हवालदार भालसिंग, सुयोग सुपेकर, याकूब सय्यद आदींचा सहभाग होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT