Despite the police understanding two child marriages took place 
अहिल्यानगर

पोलिसांनी समज देऊनही येथे झाले दोन बालविवाह 

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : तालुक्‍यातील भारजवाडी येथे दोन अल्पवयीन मुलींचे विवाह करण्यात आले. या गुन्ह्यात दहा जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, तसेच कोविड 19 व साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चाइल्ड लाइन संस्था, जिल्हा बालकल्याण समिती व पाथर्डी पोलिसांनी समज देऊनही हे बालविवाह झाले. 

याबाबत माहिती अशी

भारजवाडी येथे दोन अल्पवयीन मुलींचे विवाह होणार असल्याचे समजल्याने चाइल्ड लाइन संस्थेने पाथर्डी पोलिस, जिल्हा बालकल्याण समिती, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व स्थानिक पातळीवरील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना माहिती देऊन बालविवाह रोखण्याची विनंती केली होती. पाथर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड यांनी स्वतः भारजवाडी येथे जाऊन बालविवाह करू नये, असे दोन्ही मुलींच्या आई-वडिलांना सांगितले होती. मात्र, तरीही हे विवाह झाल्याची माहिती नगरच्या चाइल्ड लाइन संस्थेला मिळाली. चाईल्ड लाईन संस्थेने कळविल्यानंतर पोलिसांनी खात्री केली, तेव्हा हे दोन्ही बालविवाह 24 मे 2020 रोजी सकाळी नऊ वाजता लावण्यात आल्याचे समजले. 

दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल 

पोलिस कर्मचारी अरुण मुरलीधर शेकडे यांनी याबाबत दोन फिर्यादी नोंदवून गुन्हे दाखल केले. पहिल्या गुन्ह्यात मुलीचे वडील बाबासाहेब बापू शेकडे, आई आशाबाई बाबासाहेब शेकडे (रा. भारजवाडी), मुलाचे वडील प्रकाश बेळगे, मुलाची आई (नाव समजले नाही), नवरदेव रोहित प्रकाश बेळगे (रा. आवडी, ता. पैठण, औरंगाबाद); तर दुसऱ्या गुन्ह्यात मुलीचे वडील सुभाष बापू शेकडे, आई उषा सुभाष शेकडे, भाऊ राम सुभाष शेकडे, मुलाचे वडील भास्कर रामकिसन बटुळे, आई (नाव समजले नाही, रा. भारजवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

पोलिस झाले फिर्यादी 

पहिल्या बालविवाहाच्या घटनेत मुलीचे वय 17 वर्ष 11 महिने आहे आणि दुसऱ्या बालविवाहाच्या घटनेत मुलीचे वय 16 वर्षे आहे. पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना घरी जाऊन बालविवाह करू नयेत, असे सांगूनही त्यांनी विवाह केले. पोलिसांनी फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT