Destroy the village alcohol chemistry Action in Shrigonda
Destroy the village alcohol chemistry Action in Shrigonda 
अहमदनगर

गावठी दारूचे रसायन नष्ट

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे - श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू व गावठी हातभट्ट्यांवर धडक कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात राबविलेल्या मोहिमेत दोन लाख ६६ हजार रुपयांचे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करतानाच पंचवीस जणांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी ही माहिती दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार २३ ते ३० जून या काळात अवैध दारू, गावठी हातभट्टी याविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारातील श्रीगोंदे कारखाना, पेडगाव, जामदार मळा, काष्टी, शेडगाव, टाकळी कडेवळीत, कोसेगव्हाण, कोकणगाव, आढळगाव, लोणी व्यंकनाथ, पारगाव, श्रीगोंदे शहर आदी ठिकाणी पोलिसांनी छापे घातले.

यात गावठी दारू, रसायन नष्ट करून दारूबंदी कायद्याअंतर्गत २३ गुन्हे दाखल करून २५ आरोपींना अटक केली. २ लाख ६६ हजार ९२१ रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. कारवाईत निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक समीर अभंग, अमित माळी, सुनील सूर्यवंशी यांच्यासोबत कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT