devotee mandakini gavasane donate 33 lakh rs to sai baba temple trust on guru purnima Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : साईबाबांच्या झोळीत तेहतीस लाख रुपयांचे दान

Shirdi latest news in marathi | सोलापूरच्या साईभक्‍त मंदाकिनी गवसणे गुरूपौर्णिमेच्या दिवशी लीन

सतीश वैजापूरकर

शिर्डी: अमेरीकेचे भारतातील वाणिज्य दूत माईक हॅंकी यांना तीस वर्षांपासून साईंच्या दर्शनाची ओढ होती. तर सोलापूरातल्या मंदाकिनी गवसणे यांनी एकदाही शिर्डीत आलेल्या नसताना सेवानिवृत्तीनंतर आपली ३३ लाखाची पूंजी साईंच्या झोळीत, सत्पात्री दान म्हणून टाकली.

काल या दोघा अनोख्या साईभक्तांना साईमंदिरातील मध्यान्ह आरतीला सर्वात पुढे उभे राहण्याचा मान देण्यात आला. एका अर्थाने हे दोघे साईंच्या दरबारातील गुरूपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवसाचे प्रमुख पाहुणे होते.

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या दोघांचा शाल भेट देऊन सन्मान केला. हॅँकी तीस वर्षांपूर्वी कोईमतूरच्या मित्राकडे गेले. त्याने साईंची महती अन सबका मालिक एक या शिकवणुकीची महती सांगितली. तेव्हापासून शिर्डीची ओढ लागली.

योग येत नव्हता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी संस्थानला पत्र देऊन साई दर्शनासाठी येत असल्याचे कळवले. काल साईचरणी माथा टेकवत आपली तीस वर्षांपासूनची इच्छा पूर्ण केली. सोलापूरच्या गवसणे सरकारी सेवेतून निवृत्त झाल्या. घरी एकट्याच आणि पेन्शनची रक्कम गरजेहून अधिक.

मग त्यांनी शिल्लक असलेली ३३ लाख रूपयांची रक्कम साईसंस्थानला काही दिवसांपूर्वी दान देऊन टाकली. विशेष म्हणजे दान देण्यापूर्वी त्या एकदाही शिर्डीत आलेल्या नव्हत्या. सत्पात्री दान व्हावे यासाठी त्यांना बाबांची झोळी आपली वाटली.

काल गुरूपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवशी हे दोघे अनोखे साईभक्त बाबांच्या नगरीत आले. साईमंदिरातील मध्यान्ह आरतीला सभामंडपातील सर्वात पुढे असलेल्या दोन्ही बाजूच्या खांबालगत या दोघांना स्थान देऊन साईसंस्थानच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अमेरिकेचे भारतातील वाणिज्य दूत माईक हॅंकी हे भगवा कुर्ता परिधान करून साईदर्शनासाठी आले. त्यांना बाबांच्या सब का मालिक एक या संदेशाबाबत आस्था असल्याचे जाणवले. त्यांना तेलगू आणि तामीळ भाषा अवगत आहे. येथील फलक या दोन्ही भाषेत का आहेत. अशी विचारणा केल्यानंतर येथील साठ टक्के भाविक दाक्षिणात्य असल्याचे सांगितले.

-तुषार शेळके, जनसंपर्क अधिकारी, साईसंस्थान, शिर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT