Devotees have a unique Gurudakshina to Sai Baba
Devotees have a unique Gurudakshina to Sai Baba 
अहमदनगर

भक्तांची साईबाबांना अनोखी गुरूदक्षिणा...२१० रक्तपिशव्यांचे संकलन

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः साईबाबांच्या गुरूंचे स्थान, अशी ओळख असलेल्या येथील गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. दोनशे दहा भाविकांनी रक्तदान करून साध्या पद्धतीने साईचरणी गुरुदक्षिणा अर्पण केली. त्यामुळे संस्थान रुग्णालयातील हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियांसह अन्य शस्त्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला.

लॉकडाउनमुळे संस्थान रुग्णालयात या शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या मागील पंधरवड्यापासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संस्थानच्या रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा जाणवत होता.

रोज दहा रक्तपिशव्यांची गरज भासत होती. त्यामुळे गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून साईसंस्थानने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यास अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला. काल दोनशे दहा पिशव्या रक्त संकलित झाले. लॉकडाउनमुळे येथे भाविक येऊ शकत नाहीत. त्यामुळे तूर्त तरी साईसंस्थान कर्मचारी व काही ग्रामस्थ रक्तदान करून संस्थान रुग्णालयाची रक्ताची गरज भागवीत आहेत. 

राजीव गांधी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येथे राज्यभरातून रुग्ण येतात. महानगरांतील रुग्णालयांच्या तुलनेत येथे मोफत भोजन व अल्प दरात निवासव्यवस्था होते. त्यामुळे गरीब रुग्ण संस्थान रुग्णालयाला प्राधान्य देतात. शस्त्रक्रियांचे प्रमाण मोठे असल्याने, रोज दहा ते पंधरा पिशव्या रक्ताची गरज भासते. साईसंस्थानकडे सात हजार कर्मचारी आहेत.

सध्या तरी रक्ताची गरज भागविण्यासाठी त्यांच्यावरच भिस्त आहे. साईसंस्थानचे यापूर्वीचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी तिरुपती देवस्थानात केशदान, तर साईबाबांच्या शिर्डीत रक्तदान, असा उपक्रम सुरू केला. त्यास भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला होता.

येथे रोज पन्नास पिशव्या रक्त संकलित करून ते नगर, नाशिक व औरंगाबाद येथील रक्तपेढ्या घेऊन जातात. शिवाय संस्थान रुग्णालयाची गरज भागते. मात्र, लॉकडाउनमुळे भाविक येण्याचा मार्ग आणि रक्तसंकलन बंद झाले. 

साईसंस्थानने गुरुपौर्णिमेनिमित्त काल (रविवारी) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात गरजेहून अधिक, दोनशे दहा पिशव्या रक्त संकलित केले. मात्र, पंधरा टक्के दात्यांमध्ये रक्तदाब, तसेच हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना रक्तदानापासून वंचित राहावे लागले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT