Difficulty in marriage due to police 
अहिल्यानगर

पोलिस आले वधू-वरांसह वऱ्हाडी पळाले... दक्षिणा देताच आशीर्वाद देऊन गेले

सचिन सातपुते

शेवगाव : शुभमंगल म्हणण्याआधीच सावधान...पोलीस आले..असे  म्हणताच, वऱ्हाडी रानोमाळ पळाले. काहींनी  केळीच्या बागेत तर काहींनी उसाच्या पिकाचा आसरा घेतला. वधू-वरासह करवल्यांनी घरात धूम ठोकली.... ऐनवेळी ठरलेल्या विवाहात पोलिसांच्या अचानक एन्ट्रीमुळे मंगलमय वातावरणाचा रागरंगच बदलून गेला.

      
तालुक्यातील जायकवाडी धरण परिसरातील एका गावात घडलेला हा किस्सा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधामुळे विवाह सोहळे रद्द झाले आहेत. मात्र, ठरलेले विवाह एक वर्षे लांबणीवर टाकण्यापेक्षा कुठलाही गाजावाजा, डामडौल न करता साध्या पध्दतीने विवाह उरकण्याचा वधू आणि वर कुटुंबियांचा कल आहे.

अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत वधू किंवा वर पित्याच्या घरासमोर, झाडाखाली ,जनावरांच्या शेडमध्ये जन्मोजन्मीच्या सोबतीचे सात फेरे घेतले जात आहेत. प्रशासनाच्या परवानगीच्या किचकट अटी शर्थीमुळे सकाळी लवकर, रात्री उशिरा अचानकपणे विनापरवानगी विवाह पार पाडले जात आहेत.

एक-दोन दिवसांपूर्वी असाच एक विवाह तालुक्यातील जायकवाडी परिसरातील बोडखे येथे सुरू होता. याची कुणकुण शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना लांगली त्यांनी तेथे अचानक इन्ट्री केली. एखाद्या चित्रपटाला साजेशा या प्रसंगामुळे जमलेल्या व-हाडी मंडळीची पाचावर धारण बसली. ते रानोमाळ पळू लागले. केळीच्या, ऊसाच्या शेतात जिथे जागा सापडेल तिथे लपून बसले. वधू-वरासह करवल्यांनी घराच्या आतल्या खोलीचा आसरा घेतला.संबंधित पोलिसांनी वधू-वराच्या पित्यांना बोलावत परवानगी नसताना तुम्ही हे लग्न लावत असल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल होणार अाहे. तुम्हाला पोलिस ठाण्यात यावे लागेल, असा दम भरला.

दोन्ही पित्यांनी वधुवरांचे योग्य वय, मोजक्या लोकांची उपस्थिती, फिजिकल डिस्टंन्स या सगळ्या बाबी पाळल्या असल्याचे सांगत गयावया केली. मात्र, ते ऐकत नसल्याचे पाहून मध्यस्थांमार्फत तडजोड करण्यात आली. मग त्यानंतर पोलिसांनी वधूवरांना विवाहासाठी शुभाशीर्वाद देऊन तेथून काढता पाय घेतला. अन वधु-वरासह, कुटुंबीय, नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर उर्वरित विवाहविधी पार पडला. तालुक्यात या लग्नाची व तडजोडीची चर्चा चांगलीच रंगली अाहे. पोलिसांबाबत ग्रामस्थांमधून चीड निर्माण झाली आहे. संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. 

शॉर्टकट लग्नाची गरज

अत्यंत कमी खर्चात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कुठल्याही डामडौलाशिवाय साध्या पध्दतीने होत असलेल्या सध्याच्या विवाहांमुळे वधू आणि वर पित्याच्या खर्चात बचत होत आहे. त्यांचे विवाहासाठी कर्जबाजारी होण्याचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वधूवरांचे वय योग्य असलेल्या, दोन्ही कुटूंबाच्या संमतीने पार पडणाऱ्या विवाहास रितसर व तात्काळ परवानगीचे धोरण अवलंबविणे काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT