dilip khedkar sakal
अहिल्यानगर

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढणार; भगवानगड पायथ्यापासून आज प्रचाराला प्रारंभ - दिलीप खेडकर

ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आपण नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मतदारसंघात विकासाचा अजेंडा राबवणार असल्याची माहिती माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आपण नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मतदारसंघात विकासाचा अजेंडा राबवणार असल्याची माहिती माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

खेडकर म्हणाले की, उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर आपण भगवानगड पायथ्यापासून प्रचाराला प्रारंभ करणार आहोत. राज्यात मराठा-ओबीसी वाद अजूनही कमी झालेला नसून, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांना आजही मराठा समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

आमच्या पार्टीने राज्यात अठरा ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. या मतदारसंघात ओबीसींची संख्या लक्षणीय असतानाही दोन्हीही प्रमुख पक्षांनी मराठा समाजाच्या नेत्यांनाच उमेदवारी दिली आहे. माझी उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला असला, तरीही उर्वरित वेळेत आपण प्रचार पूर्ण करू.

वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, या विषयी सकारात्मक चर्चा चालू असून, वंचित निश्चित मला पाठिंबा देईल. प्रकाश शेंडगे, महादेव जाणकार या ओबीसी उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला असून, नाशिकमध्ये जर भुजबळ यांना उमेदवारी मिळाली, तर तेथेही वंचित भुजबळांना पाठिंबा देऊ शकते.

ओबीसी समाजचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य असून, मतदारसंघात ठिकठिकाणी एमआयडीसी उभारून बेरोजगारीच्या हाताला काम देण्याचा आपला मानस आहे. या मतदारसंघात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने जलसंधारणाच्या विविध योजना आपण राबवणार आहोत.

जे सध्या आपले प्रमुख विरोधी उमेदवार आहेत, त्यांना आपण आपला प्रतिस्पर्धी मानत नसून, त्यांच्यासमोर बसून कधीही चर्चा करण्याची आपली तयारी आहे. दोन्हीही उमेदवार सध्या विकासाच्या मुद्यावर काहीच बोलत नसून, केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहेत. निवडून आल्यावर आपण शेती, पाणी, बेरोजगारी, शिक्षण, वाढती व्यसनाधीनता या विषयांवर काम करणार आहोत, असेही खेडकर म्हणाले.

गडावरून दिल्ली दिसते

भगवानगडावरून आपल्याला दिल्ली दिसत असल्याचे स्व. गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. तशीच आपल्याला सुद्धा भगवान गडावरून दिल्ली दिसत असल्याचे खेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT