akole images 
अहिल्यानगर

भविष्यात फळ पिकासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होतील

शांताराम काळे

अकोले (नगर) : आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक वाणाचे संवर्धन करत असताना आधुनिकतेकडे वळून इंडोनेशिया निळे भाताचे वाण यशस्वीतेने पिकवले.  याचा राज्यातील शेतकऱ्यांना निश्चित अभिमान आहे. कोकणातील वातावरण आणि जमीन येथील वातावरणाशी जुळते मिळते असून भविष्यात काजू, आंबा, फणस या फळ पिकासाठी कृषी विभागाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होतील, अशी ग्वाही जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी शेतीनिष्ठ शेतकरी गंगाराम धिंदळे, शांताराम बारामते यांच्या सेंद्रिय शेतीला भेट देऊन या भेटीवेळी आसामी निळे भाताच्या लागवडीची पाहणी केली. 

यावेळी माजी आमदार वैभव पिचड, उपसभापती दत्तात्रय देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मंडळ अधिकारी बिबवे, कुमशेत सरपंच सयाजी अस्वले, राजूर सरपंच गणपत देशमुख, गोकुळ कान काटे, शेती निष्ठ रमाकांत डेरे परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शांताराम बारामते यांच्या शेतातील व गंगाराम धिंदळे यांच्या शेतातील निळ्या भाताची पाहणी शेतात उतरून व फुटवे काढून केली.

मी अधिकारी नाही तर तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी १२ तास शेतात काम करतो. येथील निसर्ग व पाऊस तुम्हाला वरदान ठरणार आहे. चारसूत्री पद्धत अवलंबून शेती करा, युरिया फार वापरू नका, सेंद्रिय खताचा वापर केल्यास पीकेल ते विकेल. या योजनेचा अंगीकार करून  आपले भविष्य आपणच यशस्वी करा. कृषी विभाग तुमच्या कुटुंबातील एक घटक आहे असे समजून आमच्याकडे बोट न करता आमच्या हातात हात द्या.  तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्यांची घेतलेली काळजी वाखण्याजोगी आहे. 

तुम्हाला मुंबई मार्केट जवळ आहे. जरी विकले तरी २०० रुपये मिळतात, त्यामुळे नवनवीन कल्पना करून उत्पादने घ्या. ग्राहक तयार आहे. त्यांच्यापर्यंत पोहचा. शेती वाणाचे संवर्धन करताना आधुनिकतेची कास धरून काळ भात, असामी भात, फॅन्स, काजू प्रक्रिया उद्योग उभारून आदिवासी शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांच्या उत्पादनाबरोबर स्पर्धा करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ भात व निळ्या भाताची उल्लेखनीय कामाबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले असून पिकेल ते विकेल याचे अनुकरण करून शेती करा, असे आव्हान केले. 

यावेळी सकाळ ऍग्रोवन मध्ये सरपंच सयाजी अस्वले यांचा कुमशेत गावाचा लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल त्यांचा वैभव पिचड व कृषी अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गंगाराम धिंदळे यांनी आभार मानले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT