District bank elections have started in parner taluka 
अहिल्यानगर

जिल्हा बँकेच्या निवडणुका लागल्यानं मतदार खूश, तर उमेदवारांना घोर

मार्तंड बुचूडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच जिल्हा बँकेच्या निवडणुकीस सुरूवात झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सेवासंस्था मतदार संघाची जिल्हा बँकेची तालुक्यातील गतपंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे अनेक ठराव धारक मतदार मात्र कमालीचे नाराज झाले होते. मात्र यावेळी ही निवडणूक बिनविरोध न झाल्याने मतदार मात्र खूष झाले आहेत, मात्र उमेदवारांना मात्र कमालीचा घोर लागला आहे.

तालुक्यात सेवासंस्था मतदार संघात 105 मतदार आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीत सेवासंस्था मतदार संघातून उदय शेळके यांना बिनवरोध निवडून देण्यात आले होते. यावेळी मात्र शिवसेनेचे उमेदवार रामदास भोसले हे विद्यमान संचालक व गतवेळी बिनविरोध निडून गेलेले उदय शेळके यांच्या विरोधात निवडणूक  लढवत आहेत. शेळके हे यापूर्वी सलग दोन वेळा जिल्हाबँकेचे संचालक राहिले आहेत. याही वेळी ते बिनविरोध होती, असा अनेकांचा कयास होता. मात्र तसे झाले नाही.

गतवेळी शेळके बिनविरोध झाल्याने सेवा संस्थेचे मतदार मात्र कमालीचे नाराज झाले होते. कारण मतदानासाठी सेवासंस्थेचा ठराव अनेक मतदारांनी मोठमोठ्या रकमा देऊन आपल्या नावे करून घेतले होते. इतकेच नव्हे तर काही गावात या ठरावासाठी जाहीर लिलावही झाले होते. तालुक्यातील एका गावात हा ठराव आपल्या नावे व्हावा, यासाठी साडेसात लाखांची बोली लागली होती. मात्र पुढे निवडणूक बिनविरोध झाल्याने मात्र हा खर्च फुकट गेला होता. अनेक गावात अशा प्रकारे पैसे खर्च करून मतदानाचा ठराव आपल्या नावे केल्याने व पुढे ही निवडणूक बिनविरोध झाल्याने ही मंडळी कमालीची नाराज झाली होती.

यंदाही निवडणूक बिनविरोध होती की काय असे अनेकांना वाटत होते. तर ज्यांच्या नावे ठराव आहे ते मात्र निवडणूक बिनविरोध होता कामा नये यासाठी देव पाण्यात ठेऊन प्रार्थना करत होते. यंदा मात्र उमेदवारांचे नेते मंडळींचे निवडणूक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे उमेदवारांना मात्र घोर लागला आहे. मात्र ज्या मंडळींनी खर्च करून ठराव आपल्या नावे करून घेतले आहेत, ती मंडळी मात्र कमालीची खूष झाली आहेत.

यंदाही अनेकांनी खर्च करून आपल्या नावे सेवासंस्थेचे ठराव करून घेतले आहेत. या ठराव धारक मतदारांना वेगवेगळी अमिषे दाखविली जातात. त्यात लक्ष्मीदर्शनाबरोबरच त्यांना सहलही घडविली जाते. तसेच अनेकांना नौकरीचीही अमिषे दाखविली जातात. त्यामुळे या मतदारांना या निवडणुकीत चांगलेच वजन निर्माण होत असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT