जिल्हा भूसंपादन विभागाच्या कार्यालयाचे भाडे थकल्याने संबंधित कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले असून, तातडीने ही जागा खाली करण्याचे आदेशही वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेली हक्काची जागा तर गेलीच आणि आता बिऱ्हाडही 
अहिल्यानगर

"भूसंपादन'चे बिऱ्हाड भाडे थकल्याने बाहेर 

विनायक लांडे

नगर : जिल्हा भूसंपादन विभागाच्या कार्यालयाचे भाडे थकल्याने संबंधित कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले असून, तातडीने ही जागा खाली करण्याचे आदेशही वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेली हक्काची जागा तर गेलीच आणि आता बिऱ्हाडही हलविण्याची वेळ या कार्यालयावर आली. त्यामुळे विभागाचे अधिकारी-कर्मचारी परेशान झाले आहेत. 

भूसंपादन विभागाचे कार्यालय वाडिया पार्क क्रीडा संकुलात आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया करणे व संबंधितांना मोबदला अदा करणे, हे या विभागाचे काम आहे. जिल्हाधिकारी या विभागाचे प्रमुख असून, त्यांच्याच नावे विभागाचा कारभार चालतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून, भूसंपादन विभागाचा विस्तारही मोठा आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाचे सहा अधिकारी व एका समन्वय अधिकाऱ्याची या विभागात नियुक्ती आहे. 

विभागाचे जिल्ह्यातील पूर्वीचे कार्यालय नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या मागे होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी "भूसंपादन'ची ही जागा देण्यात आली आणि भूसंपादनचे कार्यालय वाडिया पार्क संकुलातील भाडोत्री जागेत आले. मात्र, गेल्या वर्षापासून भाड्यापोटीच्या रकमेचा तगादा क्रीडा विभागाने सुरू केला. 2019 मध्ये क्रीडाधिकारी कार्यालय व भूसंपादनाचा वाद चव्हाट्यावर आला. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांपासून हा विषय चर्चेत आला. क्रीडा विभागाने भूसंपादन कार्यालयास टाळेही ठोकले. आज जागा खाली करा, असे आदेश भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावरून दिले आहेत. पर्यायी जागा म्हणून एसपी चौकातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत हे कार्यालय हलविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT