Do you know the new rules regarding postal savings account? 
अहिल्यानगर

पोस्टातील बचत खात्याबाबतचा नवीन नियम माहितीय का?

सकाळ वृत्तसेवा

नगर ः पोस्ट खात्याने बचत खात्याबाबत नवीन नियमावली आणली आहे. त्यामुळे बचत खाते असणाऱ्यांना थोडा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.सेव्हिंग खात्यातील रकमेविषयी हा नियम आहे.

पोस्टाच्या बचत खात्यात सध्या सर्वात कमी रकमेची मर्यादा ही 50 रुपये आहे. मात्र, आता 11 डिसेंबरपासून या बचत खात्यात किमान पाचशे रुपये असणे आवश्‍यक आहे.

पोस्ट ऑफीसमधील ज्या बचत खातेदारांच्या खात्यावर पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम आहे, त्यांनी 11 डिसेंबरपर्यंत त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम कमीत कमी रुपये पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त राहील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जे. टी. भोसले यांनी केले आहे. 

ज्या खातेदारांच्या बचत खात्यातील रक्कम 11 डिसेंबरनंतर पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल तर असा बचत खात्यातून मेंटेनन्स चार्जेस म्हणून शंभर रुपये व कर एवढी रक्कम वजा केली जाईल.

खात्यातील शिल्लक रक्कम जर 100 रुपयांपेक्षा कमी असेल तर अशी बचत खाती प्रणालीमधून आपोआप बंद होतील, याची खातेदारानी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. 
पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असलेल्या खातेदारांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत बचत खात्यात किमान पाचशे रुपये शिल्लक राहतील, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT