A doctor in the Philippines works at a soybean mill in Shirdi 
अहिल्यानगर

शिर्डीत सोयाबीनच्या खळ्यावर राबतोय फिलिपाईन्समधील डॉक्टर, काय भानगडंय?

सतीश वैजापूरकर

शिर्डी : सोयाबीनच्या खळ्यावर भुशाने नखशिखांत माखलेला शुभम जिजाबा गुंजाळ हा तरूण पाणी पिताना सहज म्हणाला, मी फिलीपाईन्समध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. लॉकडाऊनमुळे येथे आलो.

आई-वडिलांचा भार हलका करण्यासाठी मळणीच्या कामाला लागलो. त्याच्या या उद्‌गारामुळे, शेतमालक रावसाहेब गाढवे अचंबित झाले. त्यांनी लगेचच मळणी यंत्र बंद केले. सर्व मजुर मंडळी शुभम भोवती जमली. आपल्या सोबत डॉक्‍टर मळणी करतो हे कळाल्यानंतर तेही चकीत झाले. 

सोयाबीनच्या गंजीवरच त्याचा शॉल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कपड्यावर आणि डोक्‍यावरील केसांवर साचलेला भुसा झटकीत तो म्हणाला, मी आई वडीलांचे पांग फेडणार एमएस होऊन भारतात परतणार. सोयाबिनच्या भुशाने माखलेल्या शुभमची ही कहाणी थक्क करणारी. तशी कमालीच्या योगायोगाने भरलेली. त्याचे आई वडील रांजणगाव खुर्द येथे उसतोडणी व शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

ध्यानीमनी नसताना, काकडी विमानतळासाठी त्यांची पडीक जमिन संपादीत झाली. वीस लाख रूपये भरपाई मिळाली. त्यातील एक पैसाही या दोघांनी स्वतःसाठी खर्च केला नाही. त्याला डॉक्‍टर करण्यासाठी ही रक्कम कारणी लावायचे ठरविले. 

शुभम पंच्याहत्तर टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झाला. शेजारच्या वाकडीत त्याचा मित्र व्यंकटेश जाधव रशियात एमबीबीएस करीत होता. त्याने मार्गदर्शन केले. फिलीपाईन्स मध्ये शुभमला एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला. त्याच बरोबर तेथे शिकत असलेला मित्र रविंद्र कोते याची साथ देखील मिळाली. पहिले वर्ष पूर्ण झाले.

कोविडमुळे लॉकडाऊन सुरू झाला. येथे कष्ट केल्या शिवाय पर्याय नाही. त्याने आई वडीलांचा भार हलका करण्यासाठी स्थानीक मित्रांच्या सहकार्याने सोयाबीन मळणीचे काम हाती घेतले. तो दररोज पाचशे ते सहाशे रूपये मिळवतो. आठ दहा दिवसांपासून मळणीचे काम करतो. 
 

आई, वडील दिवसभर राबतात. त्यांनी माझ्यासाठी मोठा त्याग केला. ही जाणीव सतत पुढे जाण्याची प्रेरणा देते. मागील वर्षी मला फिलीपाईन्समध्ये जुळवून घेण्यात बराच वेळ गेला. आपण एमबीबीएस होणार याबाबत आत्मविश्वास वाटतो. मला एमएस होऊन आईवडीलांचे पांग फेडायचे आहे.

- शुभम गुंजाळ, (रांजणगाव, ता. राहाता) 

संपादन - अशोक निंबाळकर

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT