Doctors advise not to take any disease caused by rain 
अहिल्यानगर

सततच्या पावसाने अनेकांना सर्दी, ताप, खोकला पण त्याकडे दुर्लक्ष करु नका

सुनिल गर्जे

नेवासे (अहमदनगर) : सततच्या पावसाने अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसू लागली आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन नेवाशाचे आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी केले आहे. 

कोरोनाविषयी सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सततच्या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे दिसून येतात; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा श्वास घ्यायला त्रास सुरू होतो, तेव्हा रुग्ण डॉक्‍टरकडे जातो.

तोपर्यंत कोरोनाचा हल्ला फुफ्फुसांवर झालेला असतो. रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फुफ्फुसाचे नुकसान झालेले असते. येथूनच "ऑर्गन फेल्युअर'ची सुरवात होते. हा धोका टाळण्यासाठी सर्दी, खोकला जाणवताच रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा. गरज असल्यास कोरोनाची तपासणी करावी, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे. 

दवाखान्यात रुग्णांची नोंद 
तालुक्‍यातील प्रत्येक लहान-मोठ्या खासगी दवाखान्यात रुग्णांची नोंद होत आहे. संबंधित रुग्णाचा पत्ता, तसेच त्याचा संपर्क क्रमांकदेखील नोंदविण्यात येत आहे. या पद्धतीने तालुक्‍यातील प्रत्येक रुग्णावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. 

रुग्ण घेतात उशिरा उपचार 
रुग्णालयात दाखल होणारे 85 टक्के रुग्ण सर्दी, खोकला होऊन गेल्यावर, श्वास घ्यायला जेव्हा त्रास होतो, तेव्हा रुग्णालयात दाखल होतात. तोपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटलेला असतो. 

"उपचारास उशिरा सुरवात केल्याने रुग्णाच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम झालेला असतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी रुग्णांनी कुठल्याही 
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. 
- डॉ. अभिराज सूर्यवंशी, तालुका आरोग्याधिकारी, नेवासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT