Doctors of Sai Sansthan did not even get incentive allowance 
अहिल्यानगर

साई संस्थानच्या डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ताही मिळेना

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः मंजूर असलेला प्रोत्साहन भत्ता (इन्सेटिव्ह) मिळावा, या मागणीसाठी साईसंस्थानच्या रुग्णालयातील डॉक्‍टरांवर काल दिवसभर काम बंद करण्याची वेळ आली. कामाची वेळ संपल्यानंतर खोळंबलेल्या रुग्णांची डॉक्‍टरांनी तपासणी करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. व्यवस्थापनाने डॉक्‍टरांच्या रुग्ण तपासणी कक्षावर नोटीसा चिकटवून कायदेशीर कारवाईची तंबी दिली. 

लॉकडाऊन काळात रुग्णसंख्या रोडावल्याने डॉक्‍टरांचा प्रोत्साहन भत्ता स्थगित करण्यात आला होता. आता शस्त्रक्रिया व रुग्णतपासणी पुर्ववत झाल्याने पूर्वीप्रमाणे भत्ता सुरू करण्याची डॉक्‍टरांची मागणी आहे. मात्र, त्यास दाद दिली जात नसल्याने, अखेर डॉक्‍टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दिवसभर काम बंद ठेवल्याने दूरवरून आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागले. 

या बाबत काही डॉक्‍टरांशी चर्चा केली असता, ते म्हणाले, की सायंकाळी पाच वाजता कामाची वेळ संपल्यानंतर आम्ही खोळंबलेल्या रुग्णांची तपासणी केली. हादेखील निषेधाचाच भाग होता. आज तातडीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवली. काही शस्त्रक्रियाही केल्या. आमचा भत्ता बंद करताना कुणाची परवानगी घेण्याची गरज वाटली नाही; मग आता भत्ता सुरू करण्यासाठी परवानगीची गरज का वाटावी? तदर्थ समिती आणि न्याय विधी खात्याची भत्ता देण्यास मान्यता आहे, तरीही भत्ता दिला जात नाही. 

व्यवस्थापनातर्फे डॉ. आकाश किसवे, डॉ. मैथीली पितांबरे व लेखापाल बाबासाहेब घोरपडे यांनी डॉक्‍टरांसोबत चर्चा केली. संस्थान व्यवस्थापनाने भत्ता कधी देणार, याची तारीख लेखी द्यावी. आम्ही संप मागे घेतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, तसे लेखी देण्यास असमर्थता दाखविण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. डॉक्‍टरांच्या कक्षांवर नोटीसा चिकटविण्याची सूचना दिली. तोपर्यंत डॉक्‍टरांच्या कामाची वेळ संपली होती. खोळंबलेल्या रुग्णांची तपासणी करून डॉक्‍टर निघून गेले. दिवसभरात कुठलाही तोडगा निघाला नाही. रुग्णालयातील वातावरण गढूळ झाले. 

मागण्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ : लोखंडे 
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, की आंदोलन सुरू असताना शिर्डीतून मला अनेकांचे फोन आले. अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवून संप करणाऱ्या डॉक्‍टरांची मागणी रास्त आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेऊ. ग्रामीण भागातील रुग्णालयात हृदय, मेंदू व अन्य गुंतागूंतीच्या शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर यायला तयार नसतात. रास्त मागणी केली म्हणून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. आपण डॉक्‍टरांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : रामदास आठवले चिडले, राज ठाकरेंची दादागिरी; जसाश तसे उत्तर देणार, परप्रांतियांना मराठीवरून मारणे चुकीचं

Latest Maharashtra News Updates : कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, विसर्ग वाढवला

धक्कादायक! प्रेयसीशी मोबाईलवर बोलत बोलत तरुणानं घेतला गळफास; 19 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ, असं दोघांत काय घडलं?

Pravin Gaikwad: मला जीवे मारण्याचा प्रयत्न... मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा मोठा आरोप, व्हिडिओ पुरावा दाखवला

Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती प्रक्रियेत लाखोंच्या मागण्या, उमेदवारांची आर्थिक छळवणूक; ‘इन कॅमेरा’ मुलाखतींची मागणी

SCROLL FOR NEXT