Dogs feed milk to kittens at Karjat 
अहिल्यानगर

मातृत्व हरवलेल्या मांजरीच्या पिलाची कुत्रीच बनली आई, रोज पाजते दूध

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : कुत्र्या-मांजराची दुश्‍मनी पारंपरिक. मात्र, आईविना पोरक्‍या झालेल्या मांजराच्या पिलाला चक्क एका कुत्रीने सहारा दिला. स्वत:चे दूध पाजून मांजराचे पालनपोषण केले. या कुत्रीला मांजराचा चांगलाच लळा लागल्याचे दिसते. 

कर्जत शहरातील अनोख्या मातृत्वाची ही कहाणी. हॉटेल व्यावसायिक छोटू राऊत यांचे शहरालगत छोटे हॉटेल आहे. काही दिवसांपूर्वी तेथे कुत्री आणि मांजर एकाच प्रसूत झाले. त्यात मांजरीला सहा, तर कुत्रीला पाच पिले झाली. मात्र, दुर्दैवाने मांजरीसह तिच्या पाच पिलांचा मृत्यू झाला. त्यातून मांजरीचे एकच पिलू जगले. आईविना त्याचे पालन-पोषण करणे अवघड होते. मात्र, व्यावसायिक राऊत यांनी या पिलाला एके दिवशी कुत्रीचे दूध पाजले.

कुत्रीमधील मातृत्व जागे झाले. तिने स्वत:च्या पिलांसह मांजराच्या पिलालाही दूध पाजून मोठे केले. आजही मांजरीचे हे पिलू कुत्रीलाच पिते. एरवी कुत्र्या-मांजराचे वैर पहायला मिळते. मांजर दिसले की कुत्रे त्याच्या अंगावर धावून जाते. हे वैर कुत्रीच्या मातृत्वापुढे येथे ठेंगणे झाल्याचे दिसत आहे. खरे तर माणसामाणसातील शत्रुत्व संपवण्यासाठीचा संदेश तर नाही नाही....अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Updates : पंढरपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

Solapur News: 'विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा'; गुरुपौर्णिमेला दोन शिष्यांची गुरूला अनोखी दक्षिणा

SCROLL FOR NEXT