Donation of Rs 2.5 crore to Sai Baba even in lockdown 
अहिल्यानगर

लॉकडाउनमध्येही साईबाबा मालामाल...भक्तांकडून इतक्या कोटींची देणगी

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असतानाही 17 मार्च ते तीन मेदरम्यान साईभक्‍तांकडून ऑनलाइन दोन कोटी 53 लाख 97 हजार 778 रुपये देणगी प्राप्त झाल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी आज दिली. 

डोंगरे म्हणाले, ""कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

या काळात टाटा स्काय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल ऍपद्वारे थेट ऑनलाइन दर्शनाचा लाभ साईभक्‍त घरबसल्या घेत आहेत. यामध्ये टाटा स्कायवर सुमारे 35 लाख साईभक्‍त ऍक्‍टिव्हेट असून, एक लाख 12 साईभक्‍तांनी संस्थानचे मोबाईल ऍप डाउनलोड केलेले आहे. संकेतस्थळावर रोज सुमारे 8 ते 9 हजार साईभक्‍त भेट देत आहेत.

श्री साईबाबांचे मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद असले, तरीही साईभक्‍तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. जगाच्या व देशाच्या कानाकोपऱ्यांतून साईभक्‍त संकेतस्थळाद्‌वारे व मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन देणगी संस्थानला पाठवत आहेत.

17 मार्च ते 3 मे अशा 48 दिवसांच्या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाइनद्वारे दोन कोटी 53 लाख 97 हजार 778 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT