Donation of silver crown from Muslim community in Rahata 
अहिल्यानगर

मुस्लिम समाजाकडून सलोख्याचे दर्शन; वीरभद्र देवस्थानास अर्धा किलोचा चांदीचा मुकुट दान

सतिश वैजापूरकर

राहाता (अहमदनगर) : शहराचे ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र मंदिरातून काही दिवसांपूर्वी चोरांनी चांदीचा मुकुट व अन्य आभूषणे लंपास केली होती. चोरी झालेले अलंकार परतही मिळाले. मात्र, शहरातील दानशूर भाविकांनी त्याहून दुप्पट किंमतीची चांदीची आभूषणे देवस्थानास देणगी स्वरूपात दिली. मुस्लिम समाजातील व्यापारी मंडळींनी पुढाकार घेत देवस्थानास अर्धा किलोचा चांदीचा मुकुट दान करीत सामाजिक सलोखा दाखवून दिला. विधिवत पूजन करून हे अलंकार देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आले. 

काही दिवसांपूर्वी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लागण्यापूर्वीच शहरातील दानशूर भाविक सचिन भणगे, नीलेश धाडिवाल, राजेंद्र धाडगे, कपिल अग्रवाल, सचिन लुटे, सचिन कोल्हे व अमोल बनसोडे यांनी सव्वा किलो चांदीचा मुकुट देणगी स्वरूपात दिला. डॉ. स्वाधीन गाडेकर व प्रदीप पिपाडा यांनीही चांदीची आभूषणे दिली. त्यापाठोपाठ शहरातील फळव्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई शहा, इक्‍बाल शेख व असिफ शेख यांनी मंदिरातील भगवान शंकराच्या मूर्तीसाठी अर्धा किलोचा चांदीचा मुकुट दिला. शिवाय, आभूषणे खरेदीसाठी अन्य भाविकांनी सुमारे तीन लाख 75 हजार रुपयांची देणगी देवस्थानाच्या स्वाधीन केली. 

वीरभद्र मंदिरात देणगी स्वरूपात आलेल्या आभूषणांची विधिवत पूजा करण्यात आली. देवस्थानाचे अध्यक्ष सागर सदाफळ, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड व पुजारी सर्जेराव भगत यांच्या उपस्थितीत ही आभूषणे देवस्थानाच्या स्वाधीन करण्यात आली. गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, भागुनाथ गाडेकर, ऍड. नारायण कार्ले, ऍड. रघुनाथ बोठे, बाळासाहेब सोनटक्के आदी उपस्थित होते. 


भाविकांकडून देवस्थानास सुमारे पावणेचार लाखांची देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली. त्यातून देवाच्या मूर्तीजवळील दोन खांबांना सुबक नक्षीकाम असलेल्या चांदीच्या पत्र्याने मढविण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. 
- सागर सदाफळ, अध्यक्ष, वीरभद्र देवस्थान ट्रस्ट 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्याला हटवलं, मतमोजणीच्या आधी भाजपच्या बंडखोर नेत्याने केलेली IAS विरोधात तक्रार

Ujani Dam: उजनीत १०३ टीएमसी पाणीसाठा; कर्नाटकची सात टीएमसीची मागणी, ३० ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात ऐतिहासिक निकाल लागेल; पहिल्या फेरीत ४० ते ४५ हजार मते मिळण्याचा कराळे मास्तरांचा दावा

Gas Saving Tips for Diwali: दिवाळीच्या फराळाची तयारी करताना गॅसची बचत कशी कराल? सिलिंडरचा वापर कमी करण्यासाठी जाणून घ्या ५ सोपे उपाय!

Sugarcane Price Protest : सांगली-कोल्हापुरात ऊसदराचे आंदोलन पेटले; महाडिकांच्या कारखान्यावर जाणारा ट्रॅक्टर पेटवला, कुरुंदवाडमध्ये साखरेचा ट्रक अडवला

SCROLL FOR NEXT