dr malvika tambe seminar doctor Pregnancy parents ahmednagar esakal
अहिल्यानगर

Pregnancy : आई-बाबा व्हायचं आहे? ‘सेफ’ एक पर्याय

डॉ. मालविका तांबे यांचा शनिवारी अहमदनगरमध्ये परिसंवाद

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गर्भधारणा हा विषय इतका नाजूक आहे, की सहसा या विषयाची चर्चा कुठे होताना दिसत नाही. नवरा-बायको व त्यांच्या घरचे सदस्य आणि डॉक्टरच्या क्लिनिकमधील त्या मोठ्या चेंबरमध्ये याबाबतची सर्व चर्चा होताना आपल्याला दिसते. ‘आई-बाबा व्हायचं आहे?’ ही चर्चा न होता किंवा स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात असावं, यासाठी ‘सेफ’ हा पर्याय आहे.

‘सेफ’ म्हणजे नेमकं काय? वंध्यत्व हे नैसर्गिक गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यायला हवी? या सर्वांचे उत्तर मिळणार आहे ते शनिवारी (ता. १३) नगर-मनमाड रोडवरील पटियाला हाऊस सभागृहात सायंकाळी सहा वाजता डॉ. मालविका तांबे यांच्या परिसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात. परिसंवाद निःशुल्क असून, सर्वांना प्रवेश आहे.

एखादा मित्र कसा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मदत करतो, तशाच प्रकारे ‘सेफ’ प्रत्येक दाम्पत्याला मदत करणार आहे. बाळ होत नसेल, तर त्या अडचणींवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो किंवा अडचणी काही नसल्या, पण व्यवस्थित तयारी करून जर बाळ व्हायला प्रयत्न करायचे असतील त्यासाठी ‘सेफ’ हे मदत करू शकतं.

यामध्ये बीजशुद्धी ही सर्वांत महत्त्वाची असते. कारण आपले स्पर्म्स व ओवम व्यवस्थित असले, तर सुदृढ बालक जन्माला येऊ शकतं. यामध्ये काय खायला-प्यायला पाहिजे, कोणत्या रसायनांचा फायदा होईल, तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही कोणती काळजी तुमच्या दिनचर्येत व आहारात घेतली पाहिजे, हे सर्व सांगितले जाणार आहे. खरंतर एकमेकांच्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळू शकतं आणि बऱ्याच शंकांचं निरसन होऊ शकतं. त्यामुळे या परिसंवादामध्ये फर्टिलिटीशी संबंधित सर्व पैलूंवर चर्चा होणार आहे.

या परिसंवादाला बाळ होण्याची इच्छा असणाऱ्या सर्व दांपत्यांनी यायला पाहिजे. कारण त्यामुळे बऱ्याच गोष्टी समजायला मदत होईल, तसेच ज्याच्या जवळची लोकं, नातेवाईक, मित्रमंडळी त्यांनीही या परिसंवादात यायला हरकत नाही.

कारण समाजामध्ये कुठे, कोणाला त्रास होत असेल, तर आपल्याला त्याविषयी व्यवस्थित जागरूकता असली, माहिती असली, तर कोणाला तरी सल्ला देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने या परिसंवादाला आले पाहिजे. आणि ‘सेफ’ ही संकल्पना समाजामध्ये रुजू करावी. जेणेकरून पुढे येणारी पिढी ही सुदृढ, निरोगी आणि हुशार असेल. प्रवेश विनामूल्य आहे. जागा आरक्षित करण्यासाठी आपले नाव, नंबर, ई-मेल व्हॉट्‌स ॲप करणे आवश्यक आहे.

येथे करा नोंदणी

कार्यक्रमाचे स्थळ ः हॉटेल पटियाला हाऊस, रिलायन्स ट्रेडर्सच्या मागे, सावेडी, अहमदनगर.

तारीख ः शनिवार, १३ मे २०२३

वेळ ः सायं. ६ ते ८

नावनोंदणी - व्हॉट्‌सॲप ८३८०००३६९१

प्रवेश विनामूल्य. जागा आरक्षित करण्यासाठी तुमचे नाव, नंबर, ई-मेल- व्हॉट्‌स ॲप करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT