Draft voter list of Parner Nagar Panchayat published
Draft voter list of Parner Nagar Panchayat published 
अहमदनगर

पारनेर नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, हरकतींचा पाऊस

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेर नगरपंचायतीची प्रारूप यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. यादी प्रसिद्ध होताच हरकतींची पाऊस पडला आहे. अनेकांनी मतदार यादीत मोठ्या संखेने शहराच्या बाहेरील नांवे धुसडण्यात आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आता हरकतींवर थेट जाग्यावर जाऊनच शहनिशा करूऩ नांवे कमी करणे किंवा प्रभाग बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

नगरपंचायतीवर सध्या प्रशासक आहे. नगरपंचायतीच्या मतदारांची प्रारूप यादी 15 फेब्रुवारीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या नंतर 22 अखेर हरकती मागविल्या आहेत. या हरकतींवर थेट त्या त्या प्रभागात जाग्यावर जाऊन हरकतींची शहनिशा करून बोगस नांवे कामी केली जाणार आहेत.

एका प्रभागातील नांवे जर दुस-या प्रभागात गेली असतील तर ती सुद्धा हरकतीनुसार खात्री करून त्या त्या प्रभागात टाकण्यात येणार आहेत. एक मार्च रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर आठ मार्चला मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे एक मार्चनंतर कोणत्याही क्षणी नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

नगरपंचायतीमध्ये या वर्षीच्या प्रारूप यादीनुसार 12 हजार 66 मतदारंची नोंद झाली आहे. आता हरकतींचा पाऊस पडला आहे. अनेक नांवाबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे अता अनेक बोगस नांवे कमी होण्याची शक्यता आहेत. परिणामी प्रत्यक्षात या वेळी सुमारे 11 हजाराच्या आसपास मतदारांची संख्या राहाणार आहे असे दिसते. 

शहरात शहराबाहेरील आसपासच्या गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त अनेक लोक वास्तव्यास येतात अशा लोकांची नांवे मतदारयादीत येतात. मतदार म्हणून नांव नोंदणी होते मात्र बदलून गेल्यावर किंवा शहरातून बाहेरगावी राहावयास गेल्यावर कोणी या ठिकाणी मतदार यादीत असलेले नांव कमी करण्याकडे लक्ष देत नाही. त्या मुळे अशीही काही नांवे मतदार यादीत आहेत. 

काही भावी उमेद्वारांनी आपल्या पायद्यासाठीही काही आपल्या जवळची नांवे मतदारयादीत आपल्या प्रभागात समाविष्ट केली आहेत.त्यामुळे या बोगस मतदाराची नांवे कमी करण्याचे मोठे कठीण काम करावे लागणार आहे.

आम्ही हरकती मागविल्या आहेत हरकतीवर थेट सुनावणी ऐवजी आम्ही त्या प्रभागात जाऊन ती व्यक्ती तेथे राहाते किंवा नाही याची खातरजमा करत आहोत. त्या नुसार नांवे कमी करणे किंवा दुस-या प्रभागात टाकण्याचे काम करत आहोत. मतदार यादीत कोमतेही बोगस नांव राहाणार नाही याची दक्षता घणार आहोत.

-डॉ.सुनिता कुमावत, मुख्याधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT