Drivers have started rushing to get fastags in Ahmednagar 
अहिल्यानगर

Fastag Update : 'फास्टॅग'साठी वाहनचालकांची धावपळ

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : केंद्र सरकारने चारचाकी वाहनांना 'फास्टॅग' लावण्याची सक्‍ती केली आहे. ते न लावल्यास वाहनचालकांना 'टोल'नाक्‍यावर दुप्पट रक्‍कम भरावी लागणार आहे. त्यामुळे 'फास्टॅग' मिळविण्यासाठी वाहनचालकांची धावपळ सुरू झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गांवरील 'टोल'नाक्‍यांवर चारचाकी वाहनांचे 'फास्टॅग' पाहून 'टोल'वसुली सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातील सहा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, यातील केवळ कल्याण-विशाखापट्टण रस्त्याचेच काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टाकळी ढोकेश्‍वर (ता. पारनेर) व बडेवाडी (ता. पाथर्डी) येथील 'टोल'नाक्‍यांवर 'फास्टॅग'द्वारे 'टोल'वसुली केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
जिल्ह्यातील राज्य महामार्गांवरील 'टोल'नाक्‍यांवर 'फास्टॅग' व रोख, अशा दोन्ही स्वरूपांत 'टोल'वसुली सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारने सर्वच चारचाकी वाहनांना 'फास्टॅग' लावणे सक्तीचे केले आहे. न वापरल्यास दुप्पट 'टोल'आकारणी करण्यात येणार असल्याने, वाहनचालकांनी 'फास्टॅग' नोंदणीसाठी धावपळ सुरू केली आहे. सध्या बॅंक अथवा संबंधित 'टोल'नाक्‍यांवर 'फास्टॅग' नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. 

'फास्टॅग' नसलेल्या चारचाकी वाहनांना दुप्पट 'टोल' लावण्यात येत आहे, तर 'फास्टॅग' असूनही बॅंक खात्यात रक्‍कम शिल्लक नसलेल्या वाहनचालकांना 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकण्यात येत आहे. 
- प्रफुल्ल दिवाण, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT