Devotees coming to Shanidarshan have to endure obstacles and compulsions.jpg 
अहिल्यानगर

कोरोनाच्या सावटामुळे शनिशिंगणापुरातील शनिअमावस्या यात्रा रद्द

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : संपूर्ण राज्यात व जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना स्थिती लक्षात घेवून शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवार व शनिवारी बंद ठेवून अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर उपाध्यक्ष विकास बानकर, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सरपंच पुष्पा बानकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

सध्या वाढत असलेली कोरोना स्थिती लक्षात घेवून शनिअमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार (ता.१२ ) दुपारी तीन वाजता मंदिर बंद करण्यात येणार आहे. शनिवारी दिवसभर दर्शन बंद ठेवण्यात येवून रविवारी (ता.१४) रोजी दर्शन व्यवस्था पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी गावात जमावबंदीचा आदेश असल्याचे पत्र देवस्थानला दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Innovation Mahakumbh 2.0 : पुण्यात होणार इनोव्हेशन महाकुंभ २.०! एसएनडीटीतील १११ विद्यार्थ‍िंनी मांडणार स्टार्टपच्या नवसंकल्पना

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

SCROLL FOR NEXT