Due to the corona the villagers of Samrad have held a meeting and banned tourists for five days :  
अहिल्यानगर

साम्रद येथे पाच दिवस पर्यटनास बंदी; निसर्गप्रेमींनी सांदण दरी परिसरात फिरकू नये

सकाळ वृत्तसेवा

अकोले (अहमदनगर) : कोरोनामुळे साम्रद (ता. अकोले) येथील ग्रामस्थांनी बैठक घेऊन पाच दिवस पर्यटकांना बंदी घातली आहे. पर्यटक, निसर्गप्रेमींनी सांदण दरी परिसरात फिरकू नये, असे आवाहन सरपंच चंद्रप्रभा बांडे यांनी केले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. सांदण दरी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने राज्यातील पर्यटक साम्रदला येतात. या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पाच ते नऊ मार्च या कालावधीत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. सरपंच चंद्रप्रभा बांडे, उपसरपंच त्रिंबक बांडे, तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. सदस्य कोकिळा बांडे, योगिता बांडे, लालू भांगरे, एकनाथ बांडे, सुनंदा बांडे उपस्थित होते. गावाच्या शिवेवर बंदीचा फलक लावण्यात आला. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सरपंच चंद्रप्रभा बांडे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT