नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

Nitin Gadkari Mumbai Traffic Jam : मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमधील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी जुन्या पद्धतीच्या फ्लायओव्हरऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याची भावनाही व्यक्त केली.
Nitin Gadkari Mumbai Traffic Jam

Nitin Gadkari Mumbai Traffic Jam

esakal

Updated on

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना २२व्या इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६ कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी तब्बल तासभर उशीर झाला. कार्यक्रमात पोहोचल्यानंतर गडकरी यांनी उशिर झाल्याबद्दल उपस्थितांची माफी मागितली. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमधील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी जुन्या पद्धतीच्या फ्लायओव्हरऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याची भावनाही व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com