Due to falling sugar prices, the industry is in trouble 
अहिल्यानगर

साखरेचे भाव पडल्याने कारखानदारीच अडचणीत

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः जागतिक बाजारपेठेतील साखरेचे भाव घसरल्याने राज्यातील साखर कारखानदारी आर्थिक कचाट्यात सापडली आहे. आर्थिक कोंडीमुळे तसेच खाजगीकरणामुळे सहकारी चळवळ मोडीत निघण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या हितासाठी सहकार चळवळ टिकविणे व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. 

येथील अशोक कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार मुरकुटे बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, उपाध्यक्ष पोपट जाधव, माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सुरेश गलांडे, दिगंबर शिंदे, लाल पटेल, हिम्मत धुमाळ उपस्थित होते.

प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष कहांडळ यांनी प्रास्तविक केले. सोपान राऊत यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सूचनेस दिगंबर तुवर यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. 

सभेत मुरकुटे म्हणाले, देशात साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा अधिक झाल्याने गेल्या तीन वर्षापासून साखर कारखानदारीचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे अनेक कारखाने तोट्यात गेले असून कर्जाचा भार वाढला आहे. अशा संकटातून बाहेर पडायचे तर साखर उत्पादन घटवून अल्कोहोल व इथेनॉलचे उत्पादन वाढवावे लागेल. त्यादृष्टीने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाची मंजूरी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे अल्कोहोल प्रकल्पाची दैनंदिन क्षमता वाढविण्याचा 76 कोटी 55 लाखाचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यास जिल्हा सहकारी बॅंकेने मंजूरी दिल्याची माहिती मुरकुटे यांनी दिली. 

ऑनलाईन सभेत विविध विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी मुरकुटे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संचालक बबन मुठे यांनी मांडला. अशोक कामगार पतपेढीच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब दोंड यांनी मुरकुटे यांचा सत्कार केला. अभिषेक खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. लव शिंदे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले. तर कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी आभार मानले. 
 
कठीण काळात अशोक कारखाना प्रगतीपथावर 
यंदाच्या गळीत हंगामात साखरेपेक्षा बी हेवीचा वापर करुन अल्कोहोल व इथेनॉल उत्पादनावर भर दिला जात आहे. त्यामुळे साखर उतारा कमी दिसत असला तरी त्याचा पुढील वर्षाच्या एफआरपीवर परिणाम होणार नाही. साखरेच्या दरात आणि उस उपलब्धतेत दर दोन- तीन वर्षानी चढउतार होतात. त्याचा प्रतिकूल परिणाम कारखानदारीवर होतो. परंतू कठीण काळात अशोक कारखाना प्रगतीपथावर असल्याचा विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला. अहमदनगर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT