Due to increase in diesel prices farmers are plowing the land with tractors.jpg
Due to increase in diesel prices farmers are plowing the land with tractors.jpg 
अहमदनगर

बळीराजाराला पुन्हा साथ सर्जा राजाचीच; पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनं बिघडलं गणित

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे गणित चांगलेच बिघडले आहे. नांगरणी, पेरणी आदींच्या दरात वाढ झाल्याने आता पुन्हा एकदा बैलांच्या सहाय्यानेच शेती केलेली परवडेल असे मत येथील शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. 

यापूर्वी शेतकरी प्रामुख्याने शेतीची सर्व कामे बैलांच्या सहाय्याने करत होता. मात्र काळाच्या ओघात जसजसे तंत्रज्ञान प्रगत झाले तसे शेतकऱ्यांनी पेरणी, नांगरणी, वखरणी आदी कामे ट्रॅक्टरद्वारे करणेच पसंत केले. आज गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर जरी नसला तरी भाड्याने ट्रॅक्टर लावून शेतीची मशागत करताना दिसत आहे. मात्र सध्या पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे केल्या जात असलेल्या शेती मशागतीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात सर्व शेतकरी जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन, विहीर, जमीन सपाटीकरण करणे आदी कामे करत असतात. मात्र यंदाच्या वर्षी डिझेलचे दर वाढल्याने ही कामे होताना दिसत नाही. 

यापूर्वी नांगरणीचे दर ५०० रुपये इतका होता. ते दर आता ७०० रुपये इतका झाला आहे. रोटाव्हेटरमुळे शेती पेरणीसाठी लवकर तयार होते त्यामुळे बहुतांशी शेतकरी रोटाव्हेटरला पसंती देताना दिसत आहे. रोटाव्हेटरचे दर यापूर्वी ९०० रुपये इतका होता. मात्र आता ते दर १२०० रुपये इतका झाला आहे. या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागत आहे. अतिवृष्टी, हवामानातील बदल आदी कारणांमुळे अगोदरच शेतकरी त्रस्त असताना त्यातच मशागतीचे दर वाढल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडला आहे. 

सध्या सर्वत्रच ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे केली जात असल्याने शेतकऱ्यांनी आता बैलजोडी बाळगणे कमी केले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी तर आता बैलजोडी बाळगणेही बंदच केले आहे. पूर्वी सर्वच शेतकऱ्यांकडे बैलजोडीसह गायी, म्हशी राहत होत्या. आता हे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.
- गजानन कदम, प्रगतशील शेतकरी, राळेगणसिद्धी 

एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याचे सांगत ट्रॅक्टर चालकांनी शेती मशागत, नांगरणी, पेरणी, वखरणी, मळणी यांचे दर वाढविले आहेत. मात्र शेतमालाचे भाव वाढलेले नसल्याने याचा तोटा हा सामान्य शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करत डिझेलचे दर कमी करावेत.
- बाळासाहेब मापारी, प्रगतशील शेतकरी, राळेगणसिद्धी

दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे कमी दरात मशागत करणे परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने पेरणी, नांगरणी, मळणी यांचे दर वाढवावे लागत आहे. हे दर शेतकऱ्यांसाठी फायद्याचे नसले तरी आम्हाला त्याशिवाय पर्याय नाही. 
- प्रदिप मापारी, ट्रॅक्टर मालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT