

KKR
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला २८ मार्च रोजी सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जाणार आहे.
पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला (KKR) मोठा धक्का बसला आहे. त्यांचा भरवशाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आयपीएलच्या १९ व्या हंगामातूनच बाहेर झाला आहे.