Due to lack of corona patients, the corporation closed all the covid centers 
अहिल्यानगर

कोरोना रूग्णांअभावी महापालिकेने केली सर्व कोविड सेंटर बंद

अमित आवारी

नगर ः शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे बंद झालेले हे दुसरे कोविड सेंटर आहे. 

शहरातील कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या, तालुका पातळीवर सुरू झालेले कोविड सेंटर व होम आयसोलेशनमुळे शहरातील कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या कमी झाली. शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने आनंद लॉननंतर आता शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटरही बंद केले. हे कोविड सेंटर 72 दिवस चालले. त्यात 1524 रुग्णांनी उपचार घेतले. 

कोविड सेंटरसाठी महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमधील मुले-मुलींची वसतीगृहे ताब्यात घेतली होती. ही वसतीगृहे सॅनिटाईज केली आहेत. मात्र, अजूनही ती महापालिकेच्या ताब्यात आहेत. शहरातील आयुर्वेद कॉलेजमधील गुरूआनंद कोविड सेंटरही कॉलेज प्रशासनाने बंद केले.

आता शहरातील खासगी हॉस्पिटलव्यतिरिक्‍त नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग, बूथ हॉस्पिटल व कर्मयोगी सेंटर येथे कोविड सेंटर सुरू आहेत. नगर शहरात आता महापालिकेचे एकही कोविड सेंटर सुरू नाही.

कोरोना रूग्ण सापडत नसल्याने संसर्ग थांबला असे वाटत असले तरी नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकारणासाठी वापर, धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका

Delhi Police DCP Sandeep Lamba : पोलिसांनी मुलींवर कानाखाली मारणे कायद्यात बसतं का?, डीसीपी संदीप लांबांनी तरूणीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांनी घेरलं

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवर भर पावसात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Pune Rain: धरणसाखळीला पावसाचा जबरदस्त बूस्ट! अवघ्या २४ तासांत १,३८० एमसीएफटी पाण्याची आवक, साठा ७३% वर

Priyanka Gandhi: ‘आंदोलन दडपण्याचा सरकारला अधिकार नाही’; सुटकेनंतर प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT