

Delhi Police DCP Sandeep Lamba viral video
esakal
Sandeep Lamba Viral Video : संसद मोर्चादरम्यान आंदोलन करणाऱ्या महिला आंदोलकाला कानाखाली मारल्याचा आणि तिच्यावर बलप्रयोग केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांचे उत्तर-पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (Additional DCP) संदीप लांबा यांच्यावर झाला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.