

Dharmendra Pradhan on Rahul Gandhi Protest
Esakal
नीट पेपर फुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सीजेपीच्या आंदोलनानंतर आता काँग्रेसही रस्त्यावर उतरले आहे. संसद मार्चनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. दिल्ली पोलिसांनी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या नेत्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर सुटका केली. दरम्यान, यावर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर विद्यार्थ्यांच्या मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केलाय.