रास्तभाव धान्य दुकान 
अहिल्यानगर

स्वस्त धान्यापासून लाभार्थी वंचित; ऐन दिवाळीत गरीबांचे हाल

सचिन सातपुते

शेवगाव (जि. अहमदनगर) : शासनाकडून मिळणारे स्वस्त धान्य लाभार्थ्यांपर्यंत न पोहचल्याने तालुक्यातील गरीबांच्या दिवाळीवर निराशेचे सावट पसरले. दोन महिन्यांपासून तालुक्यातील १२४ स्वस्त धान्य दुकानापर्यंत शासकीय मालाचा पुरवठा न झाल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांची दिवाळी महागाईच्या सावटाखाली काळी दिवाळी ठरली.

तालुक्यातील गरीबांना स्वस्त दराने धान्य व किराणा मालाचे वितरण करण्यासाठी १२४ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तालुक्यातील आंत्योदय कार्ड धारकांची संख्या ९७१२ असून त्यावर ४५ हजार १७६ लोकसंख्या अवलंबून आहे. तर प्राधान्य योजनेचे ३२ हजार ४९५ कार्डधारक असून त्यावर १ लाख ४५ हजार ४२९ लोकसंख्या अवलंबून आहे. यंदा महागाईच्या भडक्यामुळे किराणा मालातील तेल, डाळ, साखर, शेंगदाणे यासह अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. कोरोनाच्या सावटामुळे ग्रामिण भागातील अनेक हातावर पोट असलेल्या सर्व सामान्य मजूर व कामगारांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारे धान्य व किराणा संजीवनी ठरत आहे. मात्र, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिवाळीच्या पूर्वी ऑक्टोबरमध्ये मिळणारा धान्यादी माल तांत्रिक कारणामुळे मिळाला नाही. तर शहरातील १० व ग्रामिण भागातील २० दुकानांना प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांसाठीचा माल प्राप्त झाला. उर्वरीत ९४ दुकानांना ऐन दिवाळीत माल न मिळाल्याने संबंधीत लाभार्थ्यांना त्याचे वाटप झाले नाही. त्यामुळे शासनाच्या किराणा व धान्याच्या आशेवर नजर लावून बसलेल्या लाभार्थ्यांच्या पदरी निराशा पडली.

गोरगरीब दुकानदारांकडे मालासाठी चकरा मारत होते. मात्र, तालुक्याकडून माल न मिळाल्याने दुकानदारांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वर्षातील सर्वात मोठ्या असलेल्य दिवाळीच्या सणाला देखील शासनाची या लाभार्थ्याप्रती असलेली उदासिनता दिसून आली. मात्र, त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांची दिवाळी महागाईच्या सावटाखाली काळी दिवाळी ठरली. आता नोव्हेंबर महिन्यात तरी शासनाने मालाच्या पुरवठ्याबाबत असलेली अडचण दुर करुन सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.


आक्टोबरमध्ये तांत्रिक अडचणीमुळे वाटप करण्यासाठी मालाचे वितरण न झाल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांना दिवाळीत त्याचे वाटप करता आले नाही. मात्र, या महिन्यात माल उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. - छगन वाघ, तहसिलदार शेवगाव

ऐकीकडे जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाली आहे. तर दुसरीकडे शासनानेही ऐन दिवाळीत स्वस्त धान्य दुकानातील किराणा व धान्यादी मालाचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे शासनाच्या अनास्था व महागाईच्या सावटाखाली दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. - प्रदिप निकम, सामनगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT