Education will give children better opportunities 
अहिल्यानगर

बंदी शाळेचे रूपांतर संधीशाळेत केल्यास अमूलाग्र बदल

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः जगात परिवर्तन घडवू शकणारे महात्मा गांधींचे शिक्षणविषक कृतिशील व शाश्वत विचार भारतातही मोठे परिवर्तन घडवू शकतात. वंचितांच्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि बंदीशाळेचे रुपांतर संधी शाळेत केल्यास देशात अमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास ज्येष्ठ संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केला. 

जयहिंद लोकचळवळीतर्फे आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधील शिक्षण प्रणाली या परिसंवादात ते बोलत होते. ते म्हणाले, की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. मात्र, आजही ग्रामीण भागातील अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या सर्वांना बंदी शाळेतून संधी शाळेत आणणे अत्यंत गरजेचे आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबर आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. 

डॉ. अजय पोद्दार म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीसाठी महात्मा गांधींच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी भारतात तातडीने होणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याने मूल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देणे गरजेचे आहे. 

आमदार डॉ. तांबे म्हणाले, की सध्या शिक्षणावर अपेक्षित खर्च होत नाही. समाजातील श्रीमंत व गरिब हे दोन स्तर कमी करण्याचे काम शिक्षणामुळे होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजीचे शिक्षण मिळाले तर ते चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतात. 
डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजय पोद्दार, भाऊसाहेब चासकर, अग्नेक्षा स्पायनिस्वा (पोलंड), सबरिना चौधरी (बांगलादेश), अरिफ रेहमान (पाकिस्तान), संदीप वाकचौरे, रिशिका राका, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे आदींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन संदीप वाकचौरे व उत्कर्षा रुपवते यांनी केले तर संदीप खताळ यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Voter List Fraud: सोलापुरात शिक्षक मतदारयादीत मोठा घोळ! आमदारकीच्या मतदारयादीत ११ शिक्षक बोगस; हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवले नमुने

IND vs NZ: भुवनेश्वरचे पुनरागमन, पण वैभव सूर्यवंशी बाकावरच बसणार? पहिल्या T20I साठी कशी असेल भारताची Playing XI?

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Maharashtra Weather Today : दसऱ्याला 'या' जिल्ह्यांत पाऊस धुमाकूळ घालणार; जाणून घ्या आज तुमच्या भागांत कसे असेल हवामान?

Drought Employment: दुष्काळी संकटातही फुटली रोजगाराची पालवी ;मुंबईत हिरव्या पाल्याची विक्री करत जालन्यातील महिलांचा उदरनिर्वाह

SCROLL FOR NEXT