

Bhuvneshwar Kumar - Vaibhav Sooryavanshi | India vs New Zealand T20I
Sakal
India's Probable XI for 1st T20I Against New Zealand : भारतीय टी२० संघाला २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ न्यूझीलंडला गेला असून पाचच दिवसात मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर परिस्थिती जुळवून घेऊन मैदानात उतरण्याचे आव्हान असणार आहे.
भारताला न्यूझीलंड दौऱ्यात पहिला टी२० सामना २२ ऑक्टोबर रोजी ख्राईस्टचर्च येथे खेळायचा आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरू होईल.