bikes seized Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : साडेआठ लाखांच्या दुचाकी जप्त

दोघे जेरबंद; कोपरगावातील घटना

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव - मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोविंद संजय शिंदे (रा. बेट कोपरगाव), अशिष राममिलन कोहरी (रा. पुणतांबा चौफुली, कोपरगाव, मूळ रा. अमेठी, उत्तरप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. तिसरा साथीदार नाना पानसरे हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

१९ मे रोजी बेट भागातून किशोर दिघे यांची दुचाकी चोरीला गेली होती. यार चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर. पी. पुंड, जे. पी. तमनर, संभाजी शिंदे, राम खारतोडे, जी. व्ही. काकडे यांचे एक पथक तयार करून नाकाबंदी करत होते. गोविंद संजय शिंदे याच्याकडे चोरीची दुचाकी असून तो बेटनाका येथे थांबलेला आहे, असे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली असता आरोपी शिंदे उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला.

पोलिसांना संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत विचारपूस केली. त्याची आणखी दोघांची नावे सांगून मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींनी विविध ठिकाणाहून मोटारसायकल २० मोटारसायकल पोलिसांकडे सुपुर्द केल्या. ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT