Eight lakh devotees come to Shinganapur on Saturday  
अहिल्यानगर

शनि लॉकडाउनच्या फेऱ्यातच ः शिंगणापुरात आमावस्येला येतात आठ लाख भाविक...आज आठही नव्हते

विनायक दरंदले

सोनई: कोरोना संसर्गास प्रतिबंध म्हणून शनैश्वर देवस्थान ट्रस्टने शनिशिंगणापूर येथील शनिअमावस्या यात्रेचा सोहळा रद्द केल्यामुळे आज चारशे वर्षात प्रथमच हा सोहळा सुनासुना पार पडला. भाविकांप्रमाणेच आज विश्वस्त,ग्रामस्थ व देवस्थान कर्मचा-यांनाही मंदीर परीसरात जाण्यास प्रवेश बंद केला होता.

शनिअमावस्या यात्रा असली की व्यावसायिक आठ-दहा दिवस अगोदरपासून सामानाची जमवाजमव करत असतात. यात्रेला राज्यातून व देशातून
आठ ते दहा लाख भाविकांची गर्दी होत होती. कोरोना संसर्गावर प्रतिबंध म्हणून देवस्थान ट्रस्टने तीन महिन्यापूर्वीच शनिदर्शन बंद केले आहे. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत भोये व पथकाने गावात येणा-या सर्व रस्त्यावर व मंदीराच्या
मुख्य महाद्वारासमोर मोठा बंदोबस्त ठेवला होता.

आज पहाटे साडेचार वाजता महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. यावेळी मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी व डिगंबर जोशी हे दोघेच उपस्थित होते. आज सायंकाळी होणारी महापूजा व आरती सोहळ्यास वरील तिघेच उपस्थित राहणार अाहेत. दिवसभरात शनिचौथरा भागात जाण्यास विश्वस्त, ग्रामस्थ व देवस्थान कर्मचा-यास परवानगी देण्यात आली नाही.

विश्वस्तगिरीला लगाम
मागील महिन्यात शनिजयंती सोहळ्याला पाच जणांची
परवानगी असताना काही चमको विश्वस्तांनी आपआपल्या मर्जीतील स्नेंहीजणांना चोरुन दर्शनासाठी प्रवेश दिला होता. या कामातून वंचीत ठरलेल्या एका विश्वस्तपतीने दंवडी देत टाहो फोडला. नंतर तलवार म्यान केली होती. ही बाब लक्षात घेवून प्रशासनाने आज सर्वच विश्वस्तांवर नजर ठेवत लगाम लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT