Eight members of the Standing Committee of Ahmednagar Municipal Corporation have recently been elected 
अहिल्यानगर

सभापतिपदावर लागणार अविनाश घुले यांची वर्णी; महापालिका स्थायी समितीसाठी 'राष्ट्रवादी'ची तयारी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महापालिकेतील स्थायी समितीतील आठ सदस्यांची निवड नुकतीच झाली. त्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी दोन दिवसांपासून राजकीय बैठका सुरू होत्या. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांचे नाव सभापतिपदासाठी निश्‍चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. 

मनोज कोतकर यांना केवळ चार महिनेच महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतिपद भूषविता आले. महापालिकेतील नियमानुसार एक फेब्रुवारीला 'स्थायी'चे आठ सदस्य निवृत्त झाले. नवीन सदस्य निवडीसाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नुकतीच महासभा बोलवली होती. त्यात भाजपकडून रवींद्र बारस्कर व वंदना ताठे, शिवसेनेकडून प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे व रिता भाकरे, राष्ट्रवादीकडून अविनाश घुले व समद खान, तर बसपकडून मुदस्सर शेख यांची वर्णी लागली. 

सदस्य निवडीनंतर महापौरांनी आयुक्‍तांच्या स्वाक्षरीने सभापती निवडीचा प्रस्ताव नाशिकच्या विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडे पाठविणे अपेक्षित असते. त्यानुसार 15 दिवसांत विभागीय आयुक्‍त निवडणूक कार्यक्रम जाहीर करतात. महापालिका आयुक्‍त निवडणूक घेऊन सभापती जाहीर करतात. नवीन सदस्य निवडीनंतर दोनच दिवसांत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा व त्यानंतर दोन दिवस सुट्टी आली. त्यामुळे सभापती निवडीच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वाक्षरी केलेली नाही. 

महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही. सदस्य निवडीची माहिती व सभापती निवडीचा प्रस्ताव मंगळवारी (ता.16) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या स्वाक्षरीने पाठविला जाण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांत राजकीय बैठका झाल्या असून, त्यात राष्ट्रवादीच्या घुले यांना सभापतिपद देण्यावर एकमत झाल्याचे समजते. सदस्य निवडीदरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी कुमार वाकळे यांची समजूत काढली. त्यामुळे घुले यांचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT