

Suryakumar Yadav, Aiden Markram | T20 World Cup 2026
Sakal
Harbhajan Singh Predicts T20 World Cup 2026 Semifinalists: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आता साधारण महिनाभराचा कालावधी राहिला असल्याने उत्सुकता वाढत आहे. भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ओमान अशा देशांनी या स्पर्धेसाठी संघही घोषित केले आहेत.
या स्पर्धेतही २०२४ प्रमाणेच २० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदा देखील टी२० वर्ल्ड कप रोमांचक होण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. त्यातही यंदाचा हा वर्ल्ड कप भारतीय उपखंडात म्हणजेच भारत आणि श्रीलंका या दोन देशात होणार आहेत. भारतीय संघ गतविजेता म्हणून स्पर्धेत उतरणार असून आता मायदेशात खेळताना घरच्या प्रेक्षकांसमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान भारतासमोर आहे.