ahmednagar nagar city google map 
अहिल्यानगर

शहरातील आठ ओढे-नाले गायब

अमित आवारी

नगर : शहरात सध्या महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी ओढे-नाले सफाईचे काम सुरू आहे. यात महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व ओढ्या-नाल्यांचे सर्वेक्षण करण्यास सुरवात केली आहे. यात आठ ओढे-नालेच गायब झाल्याचे आज समोर आले. या ओढ्या-नाल्यांवर काही ठिकाणी अतिक्रमणे, तर काही ठिकाणी भराव टाकल्याचे आढळून आले. ओढ्या-नाल्यांतील या बांधकामांना महापालिकेकडूनच बांधकामाची परवानगी मिळाल्याची बाब समोर आली आहे. दोन दिवसांत शहरातील सर्व ओढ्या-नाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून या संदर्भातील अहवाल हे पथक महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे सोपविणार आहे. 

दर वर्षीप्रमाणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाल्यांची साफसफाई सुरू केली. त्यातील झाडे-झुडपे, गाळ, कचरा काढण्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्व ओढे-नाल्यांसह गटारांचे सर्वेक्षण करून ते साफ करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्‍त मायकलवार यांच्याकडे केली. त्यानुसार शहरात सध्या ओढ्या-नाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

सावेडी उपनगर, सारसनगर व केडगावमधील ओढे-नाले सर्वेक्षण करत असताना गुगल मॅपमध्ये व भूमापन विभागाच्या नकाशांवर दिसणारे ओढे-नाले आठ ठिकाणी गायब झाल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या अतिक्रमणांना महापालिकेकडूनच बांधकामाची प्रशासकीय मान्यताही मिळाल्याची बाब उघड झाली आहे. काही ठिकाणी या ओढ्या-नाल्यांचा प्रवाह भराव टाकून अरुंद केल्याचे समोर आले आहे. 
 
आयुक्‍तांनाही कळाले 
शहरात 15 दिवसांपूर्वी ओढे-नालेसफाई कामापूर्वी आयुक्‍त मायकलवार यांनी शहरातील सावेडी भागातील काही ओढ्या नाल्यांची पाहणी केली. त्या वेळी त्यांना ओढ्या-नाल्यांत भराव व अतिक्रमणे झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी नालेसफाई करताना अतिक्रमणे काढण्याचे निर्देशही महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT