Eleven goats of a farmer were killed by lightning 
अहिल्यानगर

वीज पडून शेतकऱ्याच्या अकरा शेळ्या ठार

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : वारणवाडी (ता.पारनेर) येथे 
येथे गुरूवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास 
झालेल्या पावसात वीज पडुन पोपट हांडे या शेतक-याच्या ११ शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

सायंकाळी मळ्यामध्ये शेळ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडून ११ शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने या शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी संघर्ष ग्रुपचे प्रकाश गाजरे व भुमीपुत्र संघटनेच्या वतीने संतोष हांडे यांनी आमदार निलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे केली आहे.

तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणवाडी येथे हांडेवाडा परिसरात शेळ्या चारायला गेल्या असता मेंढपाळ पोपट कोंडीबा हांडे राहणार वारणवाडी  (हंडेवाडा) हे मळ्यामध्ये शेळ्या चारत असताना अचानक पाऊस व वारे सुरू झाले. त्यातच शेळ्यांच्या अंगावर वीज पडून या ११ शेळ्या जागीच दगावल्या.

संततधार पाऊस थांबल्यानंतर गुरूवारी  रात्री११ च्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी टाकळी ढोकेश्वर चे पशुधन अधिकारी डॉ. नितीन गाडीलकर डॉ.गंगाधर धरम, सरपंच गंगुबाई हरिभाऊ पिंगळे, तलाठी ए.बी येवले ग्रामसेवक प्रशांत आहिरे उपस्थित होते.

वीज पडून ११ शेळ्या मृत्युमुखी पडल्यामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुस्कान झाले आहे. त्याला शासकीय पातळीवरून मदत मिळावी, अशी मागणी परिसरात व्यक्त होत आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Meghe Passes Away : विदर्भाचा बुलंद आवाज हरपला ! माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Guru Krupa importance: गुरुकृपा, श्रद्धेमुळे आध्यात्मिक प्रवास सुलभ; साधना करत अहंकार कमी करण्याचा श्री एम यांचा सल्ला!

आरोग्य विभागाचा निर्णय! राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; नगरसेवक होणार जनआरोग्य समितीचे अध्यक्ष, वाचा...

सोलापूर झेडपी अन्‌ महापालिकेचा कारभार विरोधी पक्षनेत्यांविनाच! महापालिकेत ६२ वर्षांनंतर तर झेडपीत २४ वर्षांनंतर पहिलीच वेळ, वाचा...

शिक्षकांसाठी मोठी बातमी! ३ किलोमीटर परिसरातील २० पट नसलेले नववी-दहावीचे वर्ग होणार बंद; ३ ते ५ कि.मी.वरील शाळांसाठी ‘ही’ सवलत, वाचा...

SCROLL FOR NEXT