Employees of Nagar ZP work there despite transfers 
अहिल्यानगर

नगर झेडपीतील कर्मचारी बदल्या होऊनही जागचे हलेनात

दौलत झावरे

नगर ः जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेने राज्यात आदर्श निर्माण केला आहे. त्याचे अनुकरण राज्यात केले जात असले तरी बदल्या होऊनही अनेक कर्मचारी मूळ जागेवर कार्यरत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, महिला बालकल्याण, शिक्षक प्राथमिक, अर्थ, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य विभाग या विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावातही प्रशासनाने केल्या आहेत. या बदल्यांची प्रक्रिया राज्यात मार्गदर्शन ठरली असून त्याचे अनुकरण राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये केले जात आहे. 

यंदाच्या वर्षी 42 प्रशासकीय, 138 विनंती व 74 आपसी अशा 254 बदल्या झालेल्या आहेत. त्यातील अनेकजण आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर झालेले आहेत. मात्र प्रशासकीय व विनंती बदल्या झालेल्यांमधील काहींना अद्यापही त्यांच्या मूळ जागेवरून कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे त्यांना बदली होऊनही नव्या ठिकाणी हजर होता आलेले नाही.

नेमके अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी ठेवले की कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी हजर व्हायचे नाही, याचा कोणालाच बोध असल्याने या विषयी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थरावर चर्चा सुरु झाली आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT